shivsena leader rajesh kshirsagar criticism on chandrakant patil 
कोल्हापूर

'चंद्रकांत पाटील आंबा पडल्यासारखे मोठे झाले आहेत'! कोणी केली टीका?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आमदार चंद्रकांत पाटील आंबा पडल्यासारखे मोठे झाले असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज येथे केली. 

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाला बाईट दिला का? असा प्रश्‍नही उपस्थित करत श्री. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाला प्रत्त्युतर दिले. 

सीपीआरमध्ये बेड व कपाट वितरण कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

क्षीरसागर म्हणाले, ""मुख्यमंत्री ठाकरे यांचे काम राज्यातील सर्वसामान्य जनतेला माहीत आहे, याची जाणीव पाटील यांना असायला हवी. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, याचे उत्तम उदाहरण नारायण राणे आहेत. त्यामुळे टीकाकारांनी हा इतिहास लक्षात घेऊन बोलावे. पाच वर्षांत दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात जसा डांगोरा पिटला तसा ठाकरे पिटणार नाहीत. पाटील यांची ठाकरे यांनी राज्यभर फिरावे, अशी इच्छा असेल. पण, मुख्यमंत्री म्हणजे काय असतो, त्याने काम कसे करावे, हे ठाकरे यांनी कामातून दाखवून दिले आहे.''

ते म्हणाले, ""गेल्या तीस वर्षांत मातोश्रीवरील नेत्यांनी कधीही मीडियाला बाईट दिलेला नाही. ते सामनातून व्यक्त होत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत व संयमाने कोरोनावर मात करण्यासाठी झटत आहेत. त्यांच्यावरील टीकेने त्यांना कोणताच फरक पडणार नाही. पाटील यांनी ते पूर्वी काय होते व मोठे कसे झाले, याचे परीक्षण करावे. माणूस जसा मोठा होतो तसे त्याला पायदळी यायला वेळ लागत नाही.'' अशी टीकाही क्षीरसागर यांनी केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

SCROLL FOR NEXT