Shocking matter in Shirol taluka 
कोल्हापूर

खळबळजनक ! विलगीकरण कक्षातून झोपण्यासाठी जात होते ते घरी.....

डी आर पाटील

शिरोळ (कोल्हापूर) : जयसिंगपुर येथील विलगीकरण कक्षातील कांही नागरीक रात्रीच्यावेळी गावी झोपण्यास जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.कांही नागरीक, हेतु पुरस्कर या विलगीकरण कक्षात सोशल डिस्टन्स न पाळता एकत्र राहणे, खाणे पिणे करीत असल्याने, प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. याबाबत आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अशांचावर कायदेशीर करण्याचा इशारा दिला आहे.


दरम्यान शिरोळ तालुक्‍यात सोमवार  अखेर 594 नागरीक रेड झोनमधुन आले आहेत. या सर्व नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले असुन, त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.  या नागरीकांच्या घेतलेल्या स्वॅबचा अहवाल प्रलंबित असल्याने, आणि विलगीकरण कक्षात सोयीसुविधांचा आभाव असल्याने, त्यांची आवस्था बिकट बनली आहे. 

शिरोळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार

पुणे, मुंबई, ठाणे यासह रेडझोनमधुन 594 नागरीक शिरोळ तालुक्‍यात आले आहेत. या नागरीकांना शिरोळ, जयसिंगपूर यासह विविध गावातील संस्थात्मक विलगीकरणकक्षात ठेवण्यात आले आहे. दत्त पॉलिटेक्‍नीक कॉलेज व्यतिरीक्‍त, अन्य ठिकाणच्या विलगीकरणकक्षात सोयी सुविधांचा आभाव आहे. कांही नागरीक, हेतु पुरस्कर या विलगीकरण कक्षात सोशल डिस्टन्स न पाळता एकत्र राहणे, खाणे पिणे करीत असल्याने, प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. या नागरीकांना घरातुन जेवण देण्यात येत असले तरी, कांही नागरीक गैर वर्तन करीत आहेत. 

जयसिंगपुर येथील विलगीकरण कक्षातील कांही नागरीक रात्रीच्यावेळी गावी झोपण्यास जात आहेत. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने उमळवाड येथील स्थानीक ग्राम समिती ला इशारा दिला आहे प्रशासनाने असे प्रकार घडल्यास संबंधित ग्राम समितीवर कारवाई करण्याचा दम दिला आहे. मंगळवारी माजी खासदार राजु शेटटी, माजी आमदार उल्हासदादा पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजपचे नेते, अनिलराव यादव यांनी तहसिलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ यांची भेट घेवुन विलगीकरणकक्षातील नागरीकांचे किळसवाने प्रकाराचे किस्से सांगितले. 

उदगाव येथील रेडझोनमधुन आलेले चार नागरीक, विलगीकरणकक्षात न येता, घरी गेले होते. ही बाब दक्ष नागरीकांनी प्रशासनास निदर्शनास आणुन दिली आहे. 
रेड झोनमधुन आलेल्या नागरीकांनी शासनाच्या विलगीकरण कक्षात न आल्यास त्यांच्यावरती कारवाई केली जाईल.
सौ अपर्णा मोरे धुमाळ, तहसीलदार शिरोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT