kolhapur esakal
कोल्हापूर

आमदार जाधव यांच्या निधनाने धक्का - सतेज पाटील

आमदारांचे पार्थिव सध्या सोलापूर इथपर्यंत असून तेथून ते कोल्हापुरात एकच्या सुमारास येईल.

- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे आमदार उद्योजक आणि फुटबॉलपटू चंद्रकांत जाधव यांचे मध्यरात्री हैदराबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी एक पर्यंत कोल्हापुरात पोहोचणार असून दोन वाजेपर्यंत काँग्रेस समितीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर काशीद कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानातून दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. आमदारांचे पार्थिव सध्या सोलापूर इथपर्यंत असून तेथून ते कोल्हापुरात एकच्या सुमारास येईल. आमदार जाधव यांच्या निधनाची बातमी एकूण धक्का बसला आहे. साधे आणि सर्वात मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व होते, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकाळशी बोलताना दिली. कोविड नंतर त्यांच्या अन्ननलिके आणि हृदयाकडी ल रक्त वाहिनी ला इन्फेक्शन झाले होते.

काही महिन्यापूर्वी मुंबईत छोटी शस्त्रक्रिया ही झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पुढील शस्त्रक्रियेसाठी आठवड्याभरापूर्वी त्यांना हैदराबादमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मात्र पुन्हा इन्फेक्शन झाल्याने दोन दिवसापूर्वी आणखी छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून आणि निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT