Shocking type of land abuse 
कोल्हापूर

गुंठेवारीसह धक्कादायक प्रकार ? त्या ४० प्रकरणांतून भांडाफोड होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर तहसील कार्यालयातील गुंठेवारीसह ‘कजाप’च्या सात-बारा उताऱ्यावरील नोंदींमधून धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. चौकशीतील त्या ४० प्रकरणांतून भांडाफोड होण्याची शक्‍यता आहे. तहसील कार्यालयातील शिक्के बनावट केल्याबाबत यापूर्वीच पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. त्याचीही चौकशी आणि काही गैरव्यवहार यातून पुढे येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एकंदरीतच जमिनीच्या गैरव्यवहारातील धक्कादायक प्रकार समितीसमोर येणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते.

तहसीलदार करवीरमधील कमी जास्त पत्रकाच्या (कजाप) नोंदणीमध्ये अनियमितता आहे. नोंदणी नसलेल्या दस्तांबाबत सखोल चौकशी करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. अनियमितता आणि गैरव्यवहाराचा संशय अधिक गडद झाल्यामुळेच ही चौकशी समिती नियुक्त केल्याची माहिती आज पुढे आली आहे. एक जून २०१९ ते ३० जून २०२० दरम्यानचीच चौकशी लावण्याचे कारण काय आहे, चौकशीत बोट ठेवली जाणारी ती ४० प्रकरणे कोणती आहेत, त्यावरूनच गैरव्यवहाराचे भांडे फुटण्याची शक्‍यता आहे.


विशेष करून गुंठेवारीची बनावट कागदपत्रे तयार झाल्याचा संशय आहे; मात्र चौकशी झाल्यास कागदपत्रे कोणी तयार केली, त्यासाठी संबंधित खासगी आणि सरकारी कर्मचारी कोण आहेत, 
त्यांचीही नावे पुढे येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी समितीत ज्यांची नियुक्ती केली आहे, त्यांपैकी काहींना आजच ते चौकशी समितीत असल्याचे समजले. चौकशी झाल्यास यातून भांडाफोड होण्याची शक्‍यता आहे.

समितीची लवकरच बैठक
चौकशी समितीचे प्रमुख वैभव नावडकर यांच्यासह सदस्यांशी संपर्क साधला असता, सध्या केवळ समिती नियुक्त झाली आहे, अद्याप बैठक झालेली नाही. जोपर्यंत कागदपत्रांची तपासणी होत नाही तोपर्यंत नेमके काय झाले, हे आत्ताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

गुंठेवारी आदेशाची तपासणी
कमी जास्त पत्रकाच्या नोंदीसाठी करण्यात आलेली कामकाजातील अनियमितता तपासल्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे पुढे येण्याची शक्‍यता आहे. यातील क.जा.प. नोंदीतील नमूद गुंठेवारी आदेश बनावट आहेत काय, हे तपासले जाण्याची शक्‍यता आहे. त्यातून चौकशी नेमण्याची कारणेही पुढे येण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT