Shooting of films now started along with the series at various locations 
कोल्हापूर

कोल्हापुरात मालिकांसह चित्रपटांच्या शूटिंगचा श्रीगणेशा : ग्रामीण भागातही संधी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  कोरोनाचा कहर, लॉकडाउनचे विविध टप्पे आणि त्यातील सर्व अडचणींवर मात करत येथील विविध लोकेशन्सवर आता मालिकांबरोबरच चित्रपटांच्या शूटिंगलाही प्रारंभ झाला आहे. येत्या पंधरा दिवसांत बिगबजेट वेबसिरीजच्या शूटिंगला शहरातील विविध लोकेशन्सवर सुरवात होणार आहे. मालिका, चित्रपट असोत किंवा लघुपट, वेबसिरीज; सर्व प्रकारच्या शूटिंगवेळी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले 
जात आहे. दरम्यान, मुंबई आणि पुण्याच्या निर्मिती संस्थांनी कोल्हापूरला अधिक पसंती दिली आहे. 
 

जिल्ह्यातील विविध ठिकाणी एका चित्रपटाचे वीस दिवसांचे शेड्यूल पूर्ण होत आले असून, आणखी एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगला दोन दिवसांत प्रारंभ होणार आहे. त्याशिवाय ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर आता ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेच्या शूटिंगला दोन दिवसांत चित्रनगरीत प्रारंभ होणार आहे. एक बिगबजेट हिंदी वेबसीरिज आणि तीन कॉर्पोरेट जाहिरातींचे शेड्यूलही लवकरच लागणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे एकूणच बदललेले अर्थकारण, कमी झालेला रोजगार अशा सर्वच पार्श्‍वभूमीवर येथे घडत असलेली ही सकारात्मक स्थित्यंतरे रोजगाराच्या नव्या संधींची नांदी ठरली असून किमान पाचशे ते सहाशे स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांना रोजगार उपलब्ध 
झाला आहे. 

ग्रामीण भागातही संधी
केवळ चित्रनगरीच नव्हे, तर शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकेशन्सवर शूटिंगला मागणी आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटायझर, मास्कबरोबरच सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. गर्दीच्या विविध दृश्‍यांचे प्रत्यक्ष शूटिंग करण्यापेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापर करून ही दृश्‍ये चित्रपटात दिसणार आहेत.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT