Shops in Shirol open one day, close three days 
कोल्हापूर

शिरोळमध्ये दुकाने एक दिवस चालू, तीन दिवस बंद 

सकाळवृत्तसेवा

शिरोळ : शिरोळमध्ये तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पंचायत समिती यासह विविध कार्यालय असल्याने, शिरोळमध्ये विविध गावचे नागरीक विविध कामाकरीता येत असतात. तसेच शिरोळमध्ये व शिरोळच्या आजुबाजुस, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांच्या बैठकीत जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील अत्यावश्‍यक सेवेची दुकान वगळता, सर्व दुकाने एक दिवस चालू व तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय निर्धारीत दिवशी अथवा वेळेपेक्षा अधिक काळ दुकान चालु ठेवल्यास एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शिरोळमध्ये दोन कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे नगरपरीषद प्रशासनाने, सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत शिरोळकर नागरीकांची कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजमधुन बचाव करण्याकरीता कडक निर्बंध लावण्यास संमती दर्शवली. तर जिल्हयातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीला 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ईपासद्वारे शिरोळमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरीकांनी खोटी माहिती भरुन प्रवेश केला असेल तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. शिरोळमधील अत्यावश्‍यक सेवेची दुकाने वगळता, सर्व दुकाने एक दिवस चालु व तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोशिएशनच्या मान्यतेने घेतला. बैठकीस नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपचे नेते अनिलराव यादव, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, सचिन शिंदे, दरगु गावडे, धनाजी पाटील नरदेकर , व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष बी जी माने उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप  
- सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय 
- अत्यावश्‍यक सेवेची दुकाने वगळली 
- निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने सुरू राहिल्यास दंड 
- जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन 
- ईपासमध्ये खोटी माहिती देवून प्रवेश केल्यास फौजदारी 

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli breaks Viv Richards' record : विराट कोहलीने २०२५च्या शेवटच्या दिवशी मोडला विव्ह रिचर्ड्स यांचाही विक्रम!

Sankalp Kalkotwar : शिक्षक वडिलांनी दिलं पंखात बळ, आता नागपूरच्या मैदानात चमकतोय अहेरीचा खेळाडू

Beed Crime: परप्रांतीय ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Election Drama : एबी फॉर्मचा घोळ; नाराज इच्छुकांचे अर्ज; पुण्यात सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे संकट!

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

SCROLL FOR NEXT