The shortcut of the youth in Kalamba is a kind of dangerous, reckless driving 
कोल्हापूर

कळंबा येथे तरुणांचा शॉर्टकट धोकादायक, बेदरकार वाहना चालवण्याचे प्रकार

युवराज पाटील

कळंबा,  ः कळंबा (कोल्हापूर) गावात सुसाट वेगाने जाणाऱ्या दुचाकी वाहनांना आता ब्रेक लावण्याची गरज निर्माण झाली आहे. सायंकाळी सातनंतर दुचाकी गाड्यांचा वेग पाहता या परिसरात निश्‍चितपणे अपघाताला निमंत्रण मिळेल की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
मूळ कळंबा ग्रामस्थांचा राबता कमी आणि लगतच्या कॉलनीत तसेच पाचगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक, असे चित्र निर्माण झाले आहे. 
साई मंदिरापासून कळंब्यापर्यतचा लूक बदलून गेला आहे. व्यापारी दुकाने, बेकरी, चायनीज, फूड मॉल, मटण चिकनची दुकानांना परिसर व्यापला आहे. पुर्वी कळंब्याला जायचे म्हंटले की कोल्हापुरातील एखाद्या बेकरीत ब्रेड खरेदी करावा लागत होता. आता कोणती वस्तू मिळत नाही ती विचारा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कळंबा गावासह लगतची वस्ती सुमारे पंचवीस ते तीस हजारांच्या घरात गेली आहे. 
नागरिकाकरणाचे जसे फायदे असतात तसे काही प्रश्‍न निर्माण होतात असे म्हंटले जाते. मुख्य रस्त्यावरून गावात जाणारे सर्व रस्ते उताराला आहेत. गाडीचा वेग त्यामुळे दुप्पट होते. हल्लीची तरूण पिढी कानात वारे शिरल्यासारखी वाहन चालविते हे सर्वानाच ठाऊक आहे. कधी कोणाला कोण धडक देईल, याचा काही नेम नाही. गावात काही भागात रस्ते अरूंद आहेत. तेथून वाट शोधताना लगतच्या धरातून अचानक कोणी बाहेर येईल आणि गाडीचा धक्का लागेल, याचा नेम नाही. 
मुख्य रस्त्यावर वाहनांची रहदारी असतेच मात्र गावातंर्गत वाहतूकीचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. प्रत्येक घरात किमान एक आणि जास्तीत दोन ते तीन दुचाकी आहेतच. लगतच्या कॉलनीत जाणारे तरूण या रस्त्याचा शॉर्टकट म्हणून वापर करतात. सायंकाळी सहानंतर अंधार पडल्यानंतर गल्लीबोळात वेगाने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांची अधिक भिती बाळगावी लागते. अपघात झाल्यानंतर वैद्यकीय खर्च न परवडणारा असतो. त्यामुळे सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत दरवाजा लावून बसलेले बरे अशी ग्रामस्थांची मानसिकता झाली आहे. अपघातानंतरच छोटेसे का असेना पण स्पीड ब्रेकर करावेत, अशी मागणी होत आहे. 

गावात मध्यंतरी स्पीड ब्रेकर केले होते. मात्र त्यावर गाडीवरून पडण्याचे प्रसंग घडले. लगतच्या वस्तीतील लोक शॉर्टकट म्हणून गावातील रस्त्यांचा वापर करत असल्याने वाहतूकीची समस्या तयार झाली आहे. त्यावर निश्‍चितपणे मार्ग काढला जाईल. 
- सागर भोगम,सरपंच, कळंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मिसिंग लिंकनंतर पहिल्यांदाच द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी

Pune BJP Woman Leader: पुण्यातील महिला भाजप नेत्याचं निधन, वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

SCROLL FOR NEXT