Should The Committee Sit At The School Door? Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

समितीने शाळेच्या दारातच बसायचे काय?

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : पुण्या-मुंबईसह बाहेरगावाहून येणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण (क्वारंटाईन) केले जात आहे. आपले नातेवाईक, गावाच्या भल्यासाठी जबाबदारीने वागणे गरजेचे असताना अनेक गावामध्ये त्यांच्याकडून नियमांचे पालन केले जात नाही. सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मग ग्रामसमितीने त्यांच्यासाठी शाळेच्या दारात बसायचे काय? अशा शब्दात आज झालेल्या पंचायत समिती सभेत क्वारंटाईन व्यक्तींविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली. सभापती रूपाली कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. 

सभेच्या सुरवातीलाच गटविकास अधिकारी शरद मगर यांनी कोरोनाबाबतच्या कामकाजाचा आढावा घेतला. तालुक्‍यात आतापर्यंत 11 हजार 413 बाहेरगावचे लोक आले असून सध्या 719 जण क्वारंटाईमध्ये असल्याचे सांगितले. तालुक्‍यात येणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन एक कोव्हिड सेंटर वाढविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विनापरवाना तालुक्‍यात येणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगितले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना ही सुद्धा आपत्तीच असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विठ्ठल पाटील यांनी केली. 

अंगणवाडी कर्मचारी, आशांना प्रत्येक घराचा सर्व्हे करावा लागत आहे. वाड्या-वस्त्यांवरील घरापर्यंत रोज उन्हातून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना सायकल देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विठ्ठल पाटील यांनी केली. आशांना नेहमी सर्व्हेचे काम करावे लागते. त्यामुळे सायकल देण्याबाबत वर्षभरापूर्वीच मागणी केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांनी दिली. तालुका आरोग्य अधिकारी पोपट पाटील व पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. पी. महाले यांनी आगामी खरीप हंगाम व खतांच्या पुरवठ्याचा आढावा घेतला. पशुसंवर्धन व बांधकाम विभागाचा आढावा झाला. उपसभापती श्रीया कोणकेरी, विजय पाटील, विद्याधर गुरबे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. 

कोरोना योद्‌ध्यांचे कौतुक... 
कोरोना विरुद्धच्या लढ्यात आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालयासह खासगी डॉक्‍टर्स, सर्व कर्मचारी, अन्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी राबत आहेत. त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच गडहिंग्लज तालुक्‍यात एकही कोरानाचा रुग्ण मिळालेला नाही. या सर्व कोरोना योध्यांचे कौतुक केले. बनश्री चौगुले यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. 

समप्रमाणात कामाची मागणी... 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचायत समितीच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांची विविध कामांसाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्याचा परिणाम पंचायत समितीच्या कामकाजावर होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या कामासाठी सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना समावून घ्यावे. त्यांना समप्रमाणात कामाची विभागणी करून द्यावी, अशी मागणी जयश्री तेली यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : सर्फराज कभी धोका नही देता! भारताला हरवल्यानंतर पाकड्यांचे मानसिक संतुलन ढासळले, पाकिस्तानी मेंटॉरची मान पकडली अन्...

Lionel Messi India Tour : 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी लिओनेल मेस्सीला किती कोटी रुपये मिळाले? पोलिस तपासात आयोजकाचा खुलासा

सुरज चव्हाणने दिलेला शब्द मोडला; नव्या घराला नाही दिलं 'बिग बॉस'चं नाव; नव्या नेमप्लेटवर कुणाचं नाव?

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी विजयी उमेदवारांचा सत्कार

शाहूपुरीची पंचवीस वर्षांची पाटीलकी संपुष्‍टात! नवख्‍या अक्षय जाधव यांना मतदारांची पसंती, राजकीय चक्रव्यूह भेदले..

SCROLL FOR NEXT