shri ambabai temple kolhapur open for tomorrow diwali padwa for limited time in kolhapur 
कोल्हापूर

दिवाळी पाडव्यादिवशी मर्यादित वेळेत श्री अंबाबाई भाविकांसाठी होणार खुले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर पाडव्यादिवशी मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यात येईल. त्यानंतर मंदिरे नियमितपणे सुरू करण्यासंदर्भात देवस्थान समितीतर्फे उद्या महत्त्वाच्या घटकांची बैठक घेणार आहे. त्यात दर्शन सेवेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज दिली.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरात लॉकडाउन होता. त्यामुळे सात महिने मंदिरे बंद राहिली आहेत. आता राज्य शासनाने सोमवारपासून मंदिर खुली करण्यास मान्यता दिली आहे. त्याचाच भाग म्हणून पाडव्यादिवशी अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर मर्यादित वेळेत सुरू राहील. त्यानंतर मंदिर नियमित सुरू ठेवण्यासंदर्भात देवस्थान समिती बैठक घेईल. त्यात भाविकांनी काय काळजी घ्यावी, ते एकावेळी किती भाविकांना प्रवेश द्यायचा, आदी बाबत नवी नियमावली तयार केली जाईल. त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल. त्यानंतर सर्वानुमते मंदिरे नियमित सुरू होतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, लॉकडाउनमध्ये बंद असलेली जिल्ह्यातील मंदिर उघडण्याबाबत शासनाचे जे निर्देश येतील, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येकालाच करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे त्यासाठीच्या आवश्‍यक सूचनाही मंदिर व्यवस्थापनांना दिल्या जातील. दरम्यान, शासनाच्या सर्व नियमांचे आम्ही योग्य पद्धतीने पालन करू, असे जोतिबा मंदिर अधीक्षक महादेव दिंडे यांनी सांगितले.

"पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील श्री अंबाबाई, जोतिबा मंदिराबरोबरच सर्व मंदिरे बंद होती. शासनाच्या निर्देशानुसार ती आता उघडतील; पण लगेचच मंदिरांत गर्दी करून चालणार नाही. तोंडावर मास्क व इतर नियम पाळावेच लागतील. याबाबत उद्या नियमावली जाहीर केली जाणार आहे."

- महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Latest Marathi News Live Update : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर KDMCचा मोठा निर्णय; 20 टक्के पाणी कपातीची घोषणा

Chandoli Dam Rainfall : चांदोली, कोयना धरणात परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग! पाथरपुंजमध्ये 172 मिमी पाऊस; महाबळेश्वर, नवजा खोऱ्यात काय परिस्थिती?

कोण होती २३ वर्षीय नंदिनी? घरात आढळला मृतदेह, आपच्या तिकिटावर लढलेली निवडणूक

SCROLL FOR NEXT