Shutters Down To Gadhinglaj In The Afternoon Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला दुपारनंतर शटर डाऊन

अजित माद्याळे

गडहिंग्लज : वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने जाहीर केलेला "ब्रेक द चेन' या अभियानांतर्गत लॉकडाउएनसंदर्भात दिलेल्या आदेशाबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याने आज सकाळपासून शहरातील सर्वच दुकाने सुरू झाली; परंतु दुपारी तीननंतर प्रशासनाने दुकाने बंदचे आवाहन केले. यामुळे व्यापाऱ्यांनी शटरडाउन केले असले तरी 30 एप्रिलपर्यंत होणाऱ्या या लॉकडाउनवर व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

शासनाने या लॉकडाउनअंतर्गत नियमावली जाहीर केली आहे. शनिवार व शुक्रवार विकेंड लॉकडाउनचे आदेश दिले आहेत; परंतु विकेंड लॉकडाउनमध्ये काय बंद राहणार आणि इतर दिवशी काय सुरू राहणार यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण जिल्ह्यात तयार झाले आहे. इतर दिवशी सर्व दुकाने, बाजारपेठा बंद करण्याचे स्थानिक प्रशासनाच्या आदेशाला कोल्हापूरच्या चेंबर ऑफ कॉमर्सने विरोध दर्शविला आहे. मंगळवार हा गडहिंग्लज बंदचा दिवस असूनही आज बहुतांशी दुकाने सुरू केली होती. प्रशासनानेही सकाळच्या टप्प्यात कोणतीच भूमिका घेतली नव्हती. यामुळे व्यापारीही बिनधास्त होते. 

दरम्यान, या प्रश्‍नावर उद्या पुन्हा कोल्हापुरात बैठक होणार आहे. त्यामध्ये काय निर्णय होतो, यावर व्यापारी पुढील दिशा ठरवणार आहेत. यामुळे आज दुपारी तीननंतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्सने केले. त्यानुसार शहरातील दुकानेही दुपारी तीननंतर शटर डाउन झाली. पोलिस प्रशासनानेही दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. अत्यावश्‍यक सेवेतील दुकानेच केवळ सुरू होती. येथील चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उद्या कोल्हापूर बैठकीतील निर्णयानंतर भूमिका जाहीर करण्याची शक्‍यता आहे. एकंदरीत आज व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. रोजच अत्यावश्‍यक सेवा वगळून दुकाने, बाजारपेठा बंद असतील तर व्यापाऱ्यांतून चिंता व्यक्त करीत आहेत. 

कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न 
अत्यावश्‍यक सेवा वगळून रोजच 30 एप्रिलपर्यंत बाजारपेठा, दुकाने बंदचे आदेश कायम राहिल्यास या घटकांशी संबंधित कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. याशिवाय छोट्या व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडेही मोडणार आहे. गेल्या वेळच्या लॉकडाउनचे नुकसान अद्याप भरून निघालेले नाही. त्यात पुन्हा महिन्याच्या नुकसानीची भर पडणार आहे. विकेंड लॉकडाउनच्या कालावधीतच सर्व अस्थापना बंद ठेवावेत व इतर दिवशी सुरू ठेवावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT