siddhanerli government Grants fraud case kolhapur 
कोल्हापूर

सिद्धनेर्लीत अनुदान हडपल्याचे घडतायेत प्रकार

पंडित कोईगडे

सिद्धनेर्ली (कोल्हापूर) : येथे शौचालय न बांधताच दुसऱ्या शौचालयाचे फोटो दाखवून अनुदान उचलल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत मूळ शौचालयधारक अरविंद पाटील यांनी तक्रार केली होती.


माहिती अशी, श्री. पाटील यांनी जानेवारीत शौचालय बांधले आहे. काही दिवसांनी त्यांचे शेजारी नागेश परीट यांनी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह शौचालयाचा फोटो काढून अनुदानासाठी प्रस्ताव दिला. तो मंजूर होऊन अनुदानसुद्धा मंजूर झाले. अनुदानासाठी लागणारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसहचा फोटो पाटील यांच्या परस्पर काढला आहे. पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे चौकशी केला केली असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्यांनी पंचायत समितीकडे तक्रार करून नागेश परीट यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आपल्या शौचालयाचा फोटो दाखवून अनुदान हडपल्याचे म्हटले आहे. त्यानंतर प्रशासनाने सारवासारव केली. श्री. परीट यांनीसुद्धा शौचालय बांधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

वरिष्ठ कार्यालयाकडून तक्रार अर्जाबाबत ग्रामपंचायतीकडे सूचना आलेली नाही अथवा अहवाल मागवलेला नाही, मात्र तो मागितल्यास वस्तुस्थितीजन्य अहवाल दिला जाईल.
- दीपक कुराडे, प्रशासक

आमच्या शौचालयाचा फोटो परस्पर काढून संगनमताने हा प्रकार केला आहे. तक्रार केल्यानंतर शौचालय बांधकाम करण्यात येत होते; मात्र ते रोखले. दोषींवर कारवाई व्हावी.
- अरविंद पाटील, तक्रारदार

माझी परिस्थिती गरिबीची आहे. त्यामुळे मिळालेल्या अनुदानातून शौचालय बांधण्यासाठी मी असे केले. माझ्या हातून शौचालय न बांधता अनुदान उचलणे ही चूक झाली आहे.
- नागेश परीट, लाभार्थी ग्रामस्थ

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: भारताविरुद्ध जिंका, नाहीतर गाशा गुंडाळा, पाकिस्तानसमोर 'करो वा मरो'ची परिस्थिती; जाणून घ्या समीकरण

Bank Merger: सर्वात मोठा बँकिंग निर्णय! सार्वजनिक क्षेत्रातील 'या' दोन बँकांचे महाविलीनीकरण होणार; इतिहासात नवा अध्याय

BMC Mayor: मुंबई महापालिकेचा महापौर कधी ठरणार? नवी तारीख आली समोर

Union Budget 2026: बजेट 2026 मध्ये आरोग्य क्षेत्राला मोठी अपेक्षा; खर्चवाढ, पायाभूत सुविधा आणि परवडणाऱ्या उपचारांवर लक्ष देण्याची मागणी

Nashik News : निमाणी बसस्थानक आता रिकामे! १ फेब्रुवारीपासून सर्व बस तपोवन डेपोतून सुटणार

SCROLL FOR NEXT