celebration of shivrajyabhishek sohala in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने, गुढ्या, भगवे ध्वज उभारले...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - 'छत्रपती शिवाजी महाराज की जय....' अशा जयघोषाने आज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, निवृत्ती चौकातील अर्ध शिवाजी पुतळा परिसर दुमदुमून गेला. शिवमूर्तीवर अभिषेक व शाहिरी कार्यक्रमांनी या सोहळ्याला रंगत आणली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा सोहळा साध्या पध्दतीने साजरा झाला. शिवभक्तांनी घरी गुढ्या व भगवे ध्वज उभारले.

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, शशिकांत पाटील, बबन रानगे, कादर मलबारी, उत्तम जाधव, इंद्रजित माने, शंकरराव शेळके आदी उपस्थित होते. शाहिर दिलीप सावंत यांनी यावेळी पोवाडा सादर केला. मिलिंद सावंत यांच्या ललकारीने कार्यक्रमाची सांगता झाली. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी स्वागत केले.
शिवसेनेतर्फे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना रविकिरण इंगवले, रवि जाधव, राजू हुंबे, दीपक गौड, जयवंत हारूगले, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, मंगल साळोखे, सुनील भोसले, कपील सरनाईक आदींच्या उपस्थितीत अभिवादन झाले. दरम्यान, गंगावेश परिसरातही विविध संस्थांतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. मराठा तितुका मेळवावा ग्रुपच्या शिवदान यज्ञ उपक्रमांतर्गत मोफत शिवभोजन उपक्रम राबवण्यात आला. आम आदमी पक्षातर्फे राजारामपुरीतील नऊ नंबर शाळेमध्ये झालेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : 1935 पासून हरिनामाच्या गजरात निघते सार्वजनिक गणपतीची बैलगाडीतून मिरवणूक

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT