Simultaneously in more than sixty rehearsals Ganesha idol, installation of claws 
कोल्हापूर

साठहून अधिक तालमींत एकाचवेळी गणेशमूर्ती, पंजांची प्रतिष्ठापना 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गणेशोत्सव व मोहरम हे दोन सोहळे यंदाही एकाचवेळी येत असल्याने येथील साठहून अधिक तालमीत वेगळीच धामधूम सुरू झाली आहे. शुक्रवार (ता. 21) हरतालिका व्रत आहे. याच दिवशी मोहरमच्या पर्वाला प्रारंभ होणार आहे, तर शनिवारी (ता. 22) घरोघरी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दीमुळे संसर्ग होऊ नये, यासाठी दोन्ही सणांत विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. मोजक्‍याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची व पंजांची पूजा व विविध धार्मिक विधी होणार आहेत. 


कोल्हापूरच्या धार्मिक, सामाजिक परंपरेचा विचार केला, तर त्यात तालमींच्या सहभागाचा वाटा मोठा आहे. गणेशोत्सव व मोहरम हे प्रत्येक तालमीच्या अभिमानाचे प्रतीक आहे. गणेशोत्सवाला माहेरी येण्याची जशी माहेरवासिणींची परंपरा आहे, तशीच शहरातील मोहरमसाठी (अल्लावा) माहेरवासिनी येण्याची परंपरा आहे. यंदा या दोन्ही सणाला एकाचवेळी येण्याची संधी मिळणार असली तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व ती खबरदारी घेऊनच नैवेद्य आणि इतर धार्मिक परंपरा जपल्या जाणार आहेत. 

असा असेल सोहळा... 
शनिवारी (ता.22) गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर दोन दिवसांत सर्वत्र पंजांची प्रतिष्ठापना होईल. शहर आणि परिसरात अडीचशेहून अधिक पंजांची प्रतिष्ठापना होईल. 25 ऑगस्टला गौराईचे आगमन होईल, तर 27 ऑगस्टला घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन होईल. त्यानंतर खत्तलरात्रीचा विधी होणार आहे. 30 ऑगस्टला पंजांचे विसर्जन होईल, तर 1 सप्टेंबरला सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन होईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT