कोल्हापूर

सिंधु-रत्न योजना अखेर साकारली, अर्थसंकल्पात  300 कोटींची तरतूद

विनोद दळवी

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठीच्या `सिंधु-रत्न` योजनेसाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली. यातून नवनवीन विकासात्मक उपक्रमांबरोबरच चांदा ते बांदा योजनेतील प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यात येणार आहेत. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. गतवर्षीच्या फेब्रुवारीत मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात सूतोवाच केलेल्या या योजनेला आर्थिक तरतुदीमुळे पूर्णत्व आले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या आंगणेवाडी यात्रेसाठी जिल्ह्यात आले होते. या वेळी त्यांची जिल्ह्यात मिनी मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या वेळी त्यांनी यापूर्वीच्या सरकारची चांदा ते बांदा ही योजना बंद करण्यात आली असून सिंधु-रत्न विकास ही नवीन योजना दोन जिल्ह्यासाठी सुरू करीत असल्याचे घोषित केले होते; मात्र त्यानंतर वर्ष उलटले तरी प्रत्यक्षात काहीच नव्हते. त्यामुळे विरोधकांकडून आरोप होत होते. जानेवारीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या सिंधु-रत्न योजनेला मंजूर करण्यात आली होती. 

सोमवारी अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सिंधु-रत्न विकास योजनेला मंजुरी देण्यात येत असल्याचे सांगत 300 कोटी रुपये या योजनेला नियोजित करण्यात असल्याचे स्पष्ट केले. 

सिंधु-रत्न ही योजना कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील रखडलेल्या योजना व विकास यांना चालना मिळणार आहे. चांदा ते बांदा या योजनेत प्रलंबित राहिलेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार
"जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या कामाला आता गती मिळणार आहे. सिंधुदुर्गमध्ये पर्यटन विकासासाठी आणि मच्छीमारांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. बस स्थानकांच्या अपूर्ण कामांसाठीही तरतूद केली आहे. जलसंधारणच्या छोट्या प्रकल्पांसाठी देखील भरीव निधीची तरतूद झाली आहे. याचा फायदा शेतकरी व नागरिकांना होणार आहे. रेवंडी ते रेडी जाणाऱ्या कोस्टल रोडसाठी देखील या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वेगवेगळ्या विषयांसाठी निधीची तरतूद करून जिल्ह्याच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांचे आम्ही आभारी आहोत, असे आमदार वैभव नाईक म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावर लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा पहारा; भरधाव वाहनचालकांवर होणार कारवाई

Iran-Israel War: ''पंतप्रधान मोदींच्या एका फोनमुळे युद्ध थांबू शकतं'', UAE राजदूत हुसैन मिर्झा यांनी व्यक्ती केली अपेक्षा

Jalkot News : पं. स. सभापतीपदी काँग्रेसच्या सुनिता कोसबे तर उपसभापती माधव वाघमारे यांची निवड

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स ; जाणून घ्या संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Live Update: मनपा सभागृहात पत्रकारांना येण्यास मज्जाव, गवईंनी विचारला जाब

SCROLL FOR NEXT