This is the situation of Corona patients in Kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात अशी आहे कोरोना रूग्णांची स्थीती

सदानंद पाटील

कोल्हापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने कहर केला आहे. जिल्ह्यातील एकूण 1860 कोरोना रुग्णांपैकी 1265 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील 1265 रुग्णांपैकी 780 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज व करवीर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. 
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊ लागला आहे. 23 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. सुरुवातीला शहरातच कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र ग्रामीण भागात पहिल्यांदा शाहूवाडी तालुक्‍याने खाते उघडले. या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले. आज अखेर ग्रामीण भागात सर्वाधिक 214 रुग्ण हे शाहूवाडी तालुक्‍यातील आहेत. यातील 183 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्‍त झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 30 रुग्णांवर उपचार सुरू आहे. यानंतर चंदगड तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजे 211 रुग्ण आहेत. तर करवीर व गडहिंग्लज या तालुक्‍यात त्यापाठोपाठ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 

शाहूवाडी नियंत्रणात 
जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे शाहूवाडी तालुक्‍यात आहेत. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांचे व उपचाराचे प्रमाणही त्या ठिकाणी चांगले आहे. आत्तापर्यंत तालुक्‍यात 214 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. मात्र यातील 183 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या केवळ 30 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

गगनबावडा सर्वात कमी रुग्ण 
गगनबावडा हा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका आहेत. येथे आत्तापर्यंत केवळ 7 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

तीन तालुक्‍यात मृत्यू नाही 
जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 12 तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र यापैकी कागल, गगनबावडा व राधानगरी या तालुक्‍यात आत्तापर्यंत कोरोना बाधित एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. उर्वरित 9 तालुक्‍यात कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण आहेत. गडहिंग्लज तालुक्‍यात सर्वाधिक 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ना रूग्णांची स्थीती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT