Six buffaloes died due to power outage kolhapur
Six buffaloes died due to power outage kolhapur 
कोल्हापूर

दैव बलवत्तर म्हणून वाचला तीचा जीव पण सहा म्हशीं कोसळल्या जागेवरच अन्

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : येथील गायमुख परिसरात तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का बसून सहा म्हशींचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली. यात सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. 


येथील किसाबाई काटकर रामदास काटकर म्हशी घेऊन  घेऊन गायमुख परिसरात चारण्यासाठी गेले होते. या ठिकाणी गवताळ दलदलीचा भाग आहे. तेथे म्हशी पाणी पिण्यासाठी गेल्या होत्या. 
दरम्यान, काल (ता. २८) वादळी पाऊस झाल्याने वीजवाहिनी तुटून पडली होती. तिचा स्पर्श झाल्याने सहा म्हशी जागीच कोसळल्या. या घटनेत किसाबाई यांनाही धक्का बसला; पण हातात काठी असल्याने त्या फेकल्या गेल्याने जीव वाचला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील शेतकरी जमले. 


काटकर कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हशीवरच होता. त्यांची परिस्थिती गरिबीची असून या घटनेने डोंगरावर हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT