six pound gold necklace theft kolhapur 
कोल्हापूर

मंगलकार्यालयातून सहा तोळ्याचा सोन्याचा हार लंपास 

राजेश मोरे

कोल्हापूर  - फुलेवाडी रिंगरोड परिसरातील एका मंगल कार्यालयाच्या जानवस खोलीतील सहा तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्यांने हातोहात लंपास केला. याची नोंद करवीर पोलिस ठाणत झाली. याबाबतची फिर्याद अमरसिंह वसंतराव कमते (वय 42, रा. मंगळवार पेठ) यांनी यांनी दिली. 

पोलीसांनी दिलेली माहिती, अमरसिंह कमते हे बुधवारी (ता.20) नातेवाईकाच्या समारंभासाठी फुलेवाडी रिंगरोड येथील कार्यालयात गेले होते. त्यांच्या नातेवाईकांनी 2012 मध्ये सहा तोळ्याचा सोन्याचा राणीहार केला होता. तो हार त्यांनी मंगल कार्यालयाच्या जानवस खोलीत छोट्या पिशवीत ठेवला होता. ही पिशवी एका प्लॅस्टिकच्या बॉक्‍समध्ये ठेवली होती. चोरट्याने पिशवीतील हा हार  हातोहात लंपास केला. हा प्रकार सकाळी अवघ्या पाऊण तासात घडला.

हार चोरीला गेल्याचे समजल्यानंतर कमते यांनी याबाबतची तक्रार करवीर पोलिसात केली. त्यानुसार पोलिस ठाण्यात तीन लाखांचा हार चोरीला गेल्याची नोंद झाली. पोलिसांनी कार्यालय व परिसरातील सीसी टीव्हीआधारे चोरट्याचा शोध सुरू केला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात हे करीत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugauli Treaty: भारताविरोधात मदतीची मागणी, पण ब्रिटनने हात झटकले; नेपाळचे पंतप्रधान बालेन शाहांची कोंडी

Mumbai Local: जोरदार पावसातही लोकल सुसाट धावणार, रेल्वेचा खोळंबा टळणार; प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

TVS Bike : फक्त 47 हजार किंमत; 30 दिवसांत 42,246 लोकांनी खरेदी केली 'ही' टू व्हीलर गाडी, 58 कि.मी. स्पीड

काम तर करायची नाहीच उलट... सुप्रिया पाठारेंना कामवालीचा आलेला असा अनुभव की त्यांनी हातच जोडले; म्हणाल्या-

Latest Marathi News Update : आजपासून मुंबई टी२० लीगला सुरूवात; वानखेडे स्टेडियमवर रंगणार ३० सामने

SCROLL FOR NEXT