six sister join in police department waghave bhosale family success story kolhapur 
कोल्हापूर

अभिमानास्पद! एकाच कुटुंबातील सहा बहिणी पोलिस खात्यात: वडिलांचे स्वप्न केले पूर्ण

अर्चना बनगे

कोल्हापूर :शेतकरी कुटुंबातील एकाच घरातील सहा बहिणी राज्याच्या पोलीस खात्यात आपले कर्तव्य बजावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे या एका छोट्याशा गावातील मुलींनी कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना  घेतलेली झेप नक्कीच आजच्या युवतींना प्रेरणादायी  आहे. सहा बहिणीच्या पाठोपाठ आता दोन भाऊही देशसेवेच्या रक्षणासाठी सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले व सुजाता भोसले असे या बहिणींची नावे आहेत.


कोल्हापूर पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेला पन्हाळा किल्ला प्रसिद्ध आहे. याच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघवे या छोट्याशा गावातील खोतवाडी मध्ये भोसले कुटुंबीय आहेत.  सुरेश रंगराव भोसले, चंद्रकांत रंगराव भोसले आणि प्रकाश रंगराव भोसले हे तिघे भाऊ . प्रकाश हे कोल्हापूर येथे स्थायिक झाले तर सुरेश व चंद्रकांत गावीच शेती करू लागले. सुरेश भोसले यांना 4 मुली आणि 2 मुले तर, चंद्रकांत भोसले यांना तीन मुली .तसे वडील शिक्षक मात्र त्यांनी शेतीलाच प्राधान्य दिले. एकदा सुरेश हे पोलिसात भरती होण्यासाठी गेले. मात्र त्यांची निवड झालीच नाही. वडिलांची ही इच्छा तीन मुलींनी पुर्ण करण्याची जिद्द बाळगली.


 गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शाळा होती. शेताच्या बांधावरवरून  या मुली शाळेला जाऊ लागल्या. ध्येय एकच होते की आपण काही तरी करायचे आहे. त्यामुळे जिद्दीने त्यांचे शिक्षण सुरू राहिले. पावसाळ्यात ना पाण्याचा, ना चिखलाची पर्वा त्यांनी केली नाही.कोणताही क्लास नाही अथवा कोणाचे मार्गदर्शन नाही. केवळ स्वतः अभ्यास करूनच 2008 मध्ये सुवर्णा भोसले आणि सोनाली भोसले पोलीस खात्यात भरती झाल्या. एकाच वेळी दोघी पोलीस खात्यात गेल्यामुळे एक नवी उमेद दोघींच्या मध्ये निर्माण झाली. 

दोन बहिणींनी मिळवलेले यश उरलेल्या बहिणींनाही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरत होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अन्य बहिणींनी जिद्द कायम ठेवली आपल्या मुलींनी उंच भरारी घ्यावी अशी आशा शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांचे होती. तुम्ही कितीही शिका आणि यश मिळवा त्यांचा हा आशीर्वाद या मुलींच्यात आणखीन बळ निर्माण करणारा ठरला. सोनाली व सुवर्णा यांच्यापाठोपाठ अन्य चार बहिणीनिही पोलीस खात्यात भरती होण्याचे स्वप्न साकारले.

विशेष म्हणजे सहा पैकी पाच बहिणीचे लग्न होऊन सुद्धा सर्वजण आपले आडनाव पोलीस खात्यात भोसले हे कायम ठेवले आहे. सारिका भोसले या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात तर सुवर्णा  भोसले कोल्हापुरातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत. सुजाता भोसले अलिबाग-रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात, रुपाली भोसले नाशिक शहर पोलीस, सोनाली भोसले राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर या ठिकाणी आहेत तर विमल भोसले या कोल्हापूर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.

एकाच घरातील सहा मुलींनी मिळवलेले हे यश पंचक्रोशीला अभिमानास्पद ठरलेले आहे. त्यामुळे अनेक मुली या कुटुंबीयांकडे पोलीस भरती बाबत मार्गदर्शन  घेण्यासाठी येत असतात आणि या सर्वजणी अत्यंत उत्साहाने येणाऱ्या प्रत्येक युवतीस मार्गदर्शन करतात. या सहा बहिणींच्या पाठोपाठ आता त्यांचे दोन भाऊ देशसेवेत रुजू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आर्मीमध्ये जॉईन होण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.जिद्द आणि कष्टाच्या जोरावर स्वतः अभ्यास करून आपले ध्येय गाठता येते हेच या सहा बहिनींनी दाखवून दिले आहे. त्यांचे हे कर्तुत्व नक्कीच अनेक युवतींना प्रेरणादायी आहे.

आजोबांची इच्छा पूर्ण

आमचे आजोबा शिक्षक होते मुलीनी स्वतः शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी त्यांची नेहमी भूमिका असायची त्यासाठीच त्यांनी आम्हाला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांनी दिलेले बळ आणि कुटुंबीयांनी दिलेली प्रेरणा यामुळेच आम्ही या पदावर पोहोचू शकलो.
 विमल भोसले,शहर वाहतूक शाखा कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT