Sludge In Hiranyakeshi River Basin Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गाळामुळे हिरण्यकेशीचे पात्र झाले उथळ

रणजित कालेकर

आजरा : हिरण्यकेशी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. नदीचे पात्र उथळ झाले आहे. पुरावेळी पात्रातील पाणी पिकामध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वेक्षण करून सुळेरान ते सोहाळे बंधाऱ्यापर्यंत नदी पात्रातील गाळ काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

हिरण्यकेशी नदीत सुळेरान ते सोहाळेपर्यंत सात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. पावसाळ्यात आलेल्या पुरात या बंधाऱ्यामुळे नदी पात्रात वाहून आलेला गाळ साचतो. वर्षानुवर्षे गाळ साचला आहे. यामुळे वाळूचे ढिगाऱ्यांबरोबर छोटी-छोटी बेट तयार झाली आहेत. या बेटावर झाडे झुडपे व बांबूचे बेट वाढले असून, यामुळे आणखी गाळ साचण्याचे प्रमाण वाढले आहेत. यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येत आहे. नैसर्गिक प्रवाह मोकळे करण्याची गरज आहे. त्याचबरोबर नदीचे पात्रही उथळ झाले आहे.

पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर हे पाणी नदीपात्रालगतच्या शेतात घुसते. पूर ओसरेपर्यंत हे पाणी शेतामध्ये साचून राहते. त्यामुळे नदीकाठावरील पीक कुजून जातात. पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर शेती व पीक वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत.

हिरण्यकेशी नदी काठावर हे दरवर्षीचे चित्र आहे. त्यामुळे नदीपात्रातली गाळा काढून नदीचे पात्र खोल करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. याबाबत शासन व प्रशासनाने लक्ष घालून नदीपात्र खोल करण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज आहे. यामुळे पुरात पाणी शेतातील पिकात घुसणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

ओढे नाल्यातून येणारा कचरा थांबवा
नदीचा प्रवाह ज्या बाजूने जातो त्या बाजूला कचरा अडकलेला असतो. यामध्ये प्लास्टिकसह अन्य कचरा व गाळ असतो, तो काढल्यास नदी स्वच्छ होते. नदीच्या मूळ नैसर्गिक प्रवाहाला व नदीमधील परिसंस्थाना धक्का न देता गाळा काढावा. पर्यावरणपूरक काम व्हावे. त्याचबरोबर नदीमधे ओढे नाल्यातून येणारा कचरा थांबवता आला पाहिजे. 
- उमाकांत चव्हाण, पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Tukaram Maharaj Palkhi 2026 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; 7 जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान, यंदा वारीत काय असणार विशेष?

Shiroli Toll Naka Accident : शिरोली टोलनाक्याजवळ भीषण अपघात, पुलावरून मोटार कोसळून एक ठार; ३० फुटांवरून मोटार पडली अन्...

दिल्लीनंतर बिहारमध्ये अग्नितांडव, आग लागताच ICUमध्ये रुग्णांना सोडून पळाले कर्मचारी; तिघांचा मृत्यू, २० जण जखमी

IAI Exam Paper leak: ‘नीट’नंतर आणखी एक पेपरफुटी! ‘आयएआय’ परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल, दिल्लीतील क्लासचालकाविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update : नागपूर महानगर पालिका लोकसहभागातून 5 लाख वृक्षारोपणाची मोहीम राबविणार

SCROLL FOR NEXT