कोल्हापूर

कसबा बीडमध्ये पुन्हा आढळल्या सुवर्णमुद्रा

गावात सोन्याच्‍या मुद्रा सापडण्याचा सतत प्रत्यय येत असतो

सकाळ डिजिटल टीम

कसबा बीड : कसबा बीडमध्ये (kasba beed) दरवर्षी मृग नक्षत्राच्या सुरवातीला सोने सापडते. यंदाही या आठवड्यात दोन महिलांना सुवर्णमुद्रा (golden coins) सापडल्या. त्यामुळे ती परंपरा कायम राहिली. कोल्हापूरच्या शिलाहार (kolhapur district) राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणारे कसबा बीड गाव आहे. येथे त्या काळात सुवर्णमुद्रा ठेवल्या जात असत. त्यामुळे गावात सोन्याच्‍या मुद्रा सापडण्याचा सतत प्रत्यय येत असतो.

अनेक गावकऱ्यांना गावभागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत. स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना ''बेडा'' असे संबोधले जाते. या वरून गावाचे ''कसबा बीड'' नाव प्रचलित झाले. सापडलेल्या या बेड्यावरील कलाकुसर आजही जैसे-थे असल्याचे आढळते. एवढ्या लहानशा नाण्यावर सुस्पष्ट अंकण पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. हे बेडे प्राचीन कसबा बीडच्या गतवैभवाची साक्ष देतात. काही ग्रामस्थ असे बेडे देव्हाऱ्यात पुजतात.

गेल्या आठवड्यात २० जूनला सुशीला शहाजी मांगोरे यांना गुरव माळावर भांगलण करताना सहा मिलिमीटर व्यासाचा बेडा सापडला तर गुरुवारी अनिता विष्णू तिबिले यांना शिवयोगी मठ परिसरात तुळशी नदी घाट परिसरातील त्यांच्या शेतात भांगलण करताना सात मिलिमीटर व्यासाचा बेडा सापडला आहे. दोन्ही बेड्यांवर एकच चिन्ह आहे. एका बाजूला अलंकृत त्रिशुळाचे अंकण पहावयास मिळते. त्रिशुळाच्या बेचक्यांमध्ये उजवीकडे चंद्र तर डावीकडे सूर्याचे अंकण असल्याचे दिसते. यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी सूरज तिबिले याबाबत म्हणाल्या, ‘‘सुवर्ण नाण्यांच्या माहिती संकलनाचे काम यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी तरुण मंडळ करत आहे.’’

"कसबा बीड ऐतिहासिक स्थळ आहे. खूप वर्षांपूर्वीपासून या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये या प्रकारच्या मुद्रा मिळतात. त्या मुद्रा कोल्हापूर शिलाहार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यावर एका बाजूला त्रिशूल व त्यावर चंद्र सूर्य चिन्ह आहे. दुसऱ्या बाजूला सर्प धरून पळणारा गरुड असे चिन्ह आहे, की जे शिलाहार राजांचे प्रतीक आहे."

- नईम शेख, नाणी अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain News : पुढील पाच दिवस धोक्याचे, गरज असेल तरच घराबाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

Panchang 17 August 2025: आजच्या दिवशी श्री सूर्याय नमः मंत्राचा 108 जप करावा

न्यायपालिका सर्वोच्च नाही, राष्ट्रपती अन् राज्यपालांच्या अधिकारांवर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला स्पष्टच सांगितलं

Pune Rains : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला मायदेशी परतले; दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

SCROLL FOR NEXT