The smell of Dutt temple in Narsinghwadi is stinking kolhapur marathi news 
कोल्हापूर

नृसिंहवाडीत दत्त मंदिराच्या घाटावर दरवळतेय दुर्गंधी

सकाळ वृत्तसेवा

नृसिंहवाडी  (कोल्हापूर) : येथील दत्त मंदिराच्या उत्तर घाटावर ग्रामपंचायतीच्या गटर बांधकामाअभावी सांडपाणी घाटावर पसरून दुर्गंधी येत आहे. यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात दुर्गंधी पसरत आहे. दत्त मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे.

कन्यागत महापर्वकाळाच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतच्या पुढाकाराने देवस्थान परिसरामध्ये अनेक कामे पूर्ण झाली. देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष अमोल विभुते यांच्या पुढाकाराने परिसरातील पंचवीस घराच्या मागे सुमारे पंधरा लाख रुपये खर्चून दगडी पीचिंग व गर्दीच्या वेळी आणीबाणीचा दर्शन व नवैद्य मार्गावर कॉंक्रिटीकरण केले. दरम्यान या ठिकाणी पंचवीस घराच्या मागे सांडपाणी जाण्यासाठी गटारीचे नियोजन होते. यासाठी सव्वा लाखाचा निधी मंजूर आहे. मात्र वर्षभरापासून या ठिकाणी ठेकेदारांनी कोणत्याही पद्धतीने बांधकाम न केल्यामुळे परिसरामध्ये दूषित पाणी घाटावर पसरत असल्याने दत्त मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे.

कन्यागत महापर्वकाळाच्या दुसऱ्या टप्प्यात येथील कामासाठी निधी मंजूर असूनदेखील ठेकेदारांच्या नियोजनाअभावी गटरचे बांधकाम रेंगाळले आहे. उत्तर घाटावर सांडपाण्यामुळे हिरवे तण वाढत आहे. हे सांडपाणी नदीत मिसळल्यामुळे त्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी मर्यादा येत असून पाणी प्रदूषण होण्यास त्यामुळे मदत होत आहे. दत्त देवस्थान दत्त मंदिराच्या उत्तर घाटावर गेल्या वर्षभरात सर्व स्वच्छता करून परिसरांमध्ये भाविकांना दर्शनानंतर विसाव्यासाठी एक उद्यान बनवायचा आहे. 

पाच लाख देणगी 
दत्त देवस्थानने ग्रामपंचायतीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी पाच लाख देणगी दिली; मात्र ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी देवस्थान परिसरात गटर्सचे बांधकाम अद्याप केले नाही. देवस्थानने ग्रामपंचायतीस भरघोस निधी दिला मात्र ग्रामपंचायत पुरस्कृत ठेकेदाराने अद्याप बांधकाम न केल्यामुळे परिसरात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 


मंदिर परिसरामध्ये भाविकांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. वर्षभरात ग्रामपंचायत व ठेकेदाराने गटर्सचे बांधकाम पूर्ण न केल्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. पाणी थेट नदीत सोडले जात आहे. वयस्कर लोकांना दर्शनासाठी व महापूजा झाल्यावर उत्सव मूर्तीसाठी नवैद मार्ग केला आहे. हा मार्ग महत्त्वपूर्ण असून लवकरात लवकर ग्रामपंचायत व ठेकेदारांनी याकामी लक्ष घालून गटर्स बांधकाम पूर्ण करावे. 
- अशोकराव पुजारी, अध्यक्ष, दत्त देवस्थान, नृसिंहवाडी 

मजुरांची टंचाई असल्याने गटर उभारणीरला थोडा वेळ होत आहे. येत्या चार दिवसांत कामाचा प्रारंभ करणार आहोत. 
- दीपक कबाडे, ठेकेदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

Nitesh Rane Non Bailable Warrant : नितेश राणेंना गोवा पोलिस अटक करणार? अजामीनपात्र वॉरंट; टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयाची कारवाई

Ramdas Athawale: ठाकरेंनी रामरक्षा नव्हे तर ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करावे; मंत्री आठवलेंचा टोला

AUS W vs ENG W Final: आज महिला टी-20 विश्वचषक फायनल; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल मॅच... महामुकाबला

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

SCROLL FOR NEXT