snake catcher arrested in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

धक्कादायक : विषारी नाग पकडायचा, त्याचे चुंबन घेत खेळ करायचा, तो डंख मारू लागताच माणसांच्या गर्दीत सोडायचा...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - विषारी साप पकडायचा, त्याचे चुंबन घेत खेळ करायचा, त्याचे फोटो फेसबुकवर टाकायचा. पण त्याला ही चांगलीच महागात पडली. नाग पकडून त्याच्याशी जीवघेणा स्टंटबाजी केल्याचा व्हीडीओ फेसबुकवर घुमला आणि वन्यजीवाचा छळ केल्या प्रकरणी त्याला वनकोठडीची हवा खान्याची वेळ आली. अल्ताफ कलावंत (वय 36 रा. इचलकरंजी) असे त्या संशयितांचे नाव आहे. 


वन्यजीवांचा खेळ केल्या प्रकारणी वन्य जीवकायदा 1972 अंतर्गत 39, 40, 42, 43 आदी कलमानुसार या तरूणाला इचलकरंजीत अटक केली. त्याला तीन दिवस वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. 

गेल्या काही दिवसापासून एक व्यक्ती नागपकडून त्याच्या सोबत दंगा मस्ती करीत होता. तो नाग डंख मारू लागताच त्याला उचलून गर्दीच्या ठिकाणी फेकत होता. अशा धक्कादायक प्रकारची काही छायाचित्रे, व्हीडीओ समाजमाध्यमावर प्रसारीत झाली. 

त्याची माहिती वनविभागाला मिळताच माहिती सहाय्यक वनसंरक्षक तंत्रज्ञानाव्दारे शोध घेऊन कोल्हापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या तरूणाला इचलकरंजीत सकाळी अटक केली. त्याच्याकडे चौकशी करताना साप पकडण्याची काठी, मोबाईल फोटो व्हिडीओ असे साहित्य मिळून आले. 

या तरूणाचे अन्य कोणी साथीदार आहेत, त्याने आत्ता पर्यंत किती साप पकडले, त्याचे पुढे काय केले. तस्करी झाली का विष काढले का? आदी बाबत माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. 

या कारवाईत वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल घनशाम भोसले, वनरक्षक सागर यादव, सागर पटकारे आदीनी सहभाग घेतला. 

या पुढे ही होणार कारवाई 
सहाय्यक उपवनसंरक्षक सुनिल निकम म्हणाले की, "" वन्यजीवांना पकडून त्यांचा खेळ करणे किंवा त्यांना इजा पोहचेल असे कृत्य करणे वन्यजीव कायद्याचे उल्लंघन आहे. अशा व्यक्ती विरोधात वन्यजीव कायद्या अन्वये गुन्हा नोंद होऊ शकतो. तसेच वन्यजीव कुठे आढळल्यास त्याची माहिती वनविभागाला देणे अपेक्षीत आहे. वन्यजीवाला इजा पोहचविल्यास अन्न साखळी धोक्‍यात येऊ शकते. त्यामुळे वन्यजीवांशी खेळणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर या पुढेही कारवाई सुरू रहाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT