So the disgrace of revoking the license on hospitals 
कोल्हापूर

तर रुग्णालयांवर परवाना रद्दची नामुष्की

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर ः शहरासह जिल्ह्यात खासगी रुग्णालयांकडून जादा बिलांची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. ज्या रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा अधिक पैसे मागितले जातात त्यांनी पालिकेकडे तक्रार करावी, बिल आदा करू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे. तक्रार आलेल्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी देसाई यांनी दिला आहे.

कोरोनामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. अनेकांचे पगार निम्मे झाले आहेत. अनेकांना नोकरीवरून कमी केले आहे. औद्योगिक वसाहतीतील कामागारांची संख्या कमी आहे. अनेकांना दैनंदिनी चालविणेही अवघड झाले आहे. अशा स्थितीच रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत अनेक सेवाभावी संस्था पुढे येऊन एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांत दाखल करून घेण्यासाठी अनेकांना पराकाष्टा करावी लागत आहे. तीत भरमसाट बिलांचा आकाडा पाहून नातेवाइकांना चक्कर यायची वेळी आली आली. त्यामुळे याची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे. 
खासगी रुग्णालयांकडून अतिरिक्त बिलांची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रशासनाकडून जास्तीत जास्त रुग्णांवर योग्यवेळी उपचारासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरीही अनेकांना खासगी रुग्णालयाचांकडे जावे लागत आहे. 
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. 

पालिकेकडे तक्रार द्या 
खासगी डॉक्‍टरांकडून, रुग्णालयांकडून नियमापेक्षा अधिक बिल आकारले जात आहे. या बिलांवर प्रशासनाचा वचक ठेवण्यासाठी ऑडिटर नेमले आहेत. तरीही काही जादा बिलांच्या तक्रारी आहेत. बिल जादा आकरल्याचे दिसून येत असल्यास रुग्णांच्या नातेवाइकांनीही बिल देऊ नये. संबंधितांच्या विरोधात पालिकेकडे तत्कार करावी. रुग्णालय दोषी आढळल्यास त्यांचा परवाना तातडीने रद्द करण्याची कारवाई करू, याबाबत पालिका आयुक्तांकडून कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT