social media diwali celebration but cyarli 
कोल्हापूर

मोबाईल हॅंग होण्याची आलीय वेळ; समाज माध्यमात दिवाळीची धूम 

रवींद्र माने

तासगाव (सांगली) : व्हॉट्‌सएप, फेसबुक आणि अन्य सोशल ऍप्सवर चार दिवसांपासून दिवाळीची धूम सुरू आहे. सोशल मिडियावर शुभेच्छांचा पाऊस पडतोय. प्रत्यक्षात एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्यापेक्षा "व्हर्च्युअल' शुभेच्छा देण्यात नेटकरी समाधान मानत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर हे चांगले आहे. पण, प्रत्यक्ष भेटून कितीजणांनी शुभेच्छा दिल्या हे गुलदस्त्यात आहे. 


चार दिवसांपासून सगळ्याच समाजमाध्यमावर (सोशल।मीडिया) दिवाळीची धूम सुरू आहे. दिवाळीच्या शुभेच्छांची अक्षरशः रंगीबेरंगी बरसात होते आहे. वसूबारस म्हणजे काय माहिती नसणारे चक्क वसू बारसेच्या शुभेच्छा देत आहेत. दिवाळीच्या या शुभेच्छांत रंग आहेत. रांगोळ्या आहेत. शब्द आहेत. संगीत आहे. स्वतःचे, कुटुंबाचे फोटो आहेत.

एक ना अनेक प्रकारची शुभेच्छापत्रे पाहून दिवाळी इतकी भारी आणि छान मस्त असते हे कळते. दिव्याचे महत्व, फटाक्‍यांची गंमत, मानवी नातेसंबंधातील दिवाळीचे महत्व दिवाळी मने कशी जोडते हे सारे काही व्यक्त होत आहे. काही दिवाळी शुभेच्छा तर संगीत आणि सिनेमाला जोडून दिल्या जात आहेत. त्याशिवाय दिवाळीच्या झाडलोट करण्यापासून ते फराळ तयार करत पहिला लाडू पहिली चकली, असे म्हणत फोटो अपलोड केले जात आहेत.

कौतुकाने एकमेकांना शेअर केले जात आहेत.  कधीकाळी दिवाळीत एकमेकांना भेटण्यास मित्र परिवार आवर्जून येत. फराळानिमित्त घरी येणे-जाणे होई. किंबहुना त्यासाठीच सण साजरे होत. सध्या मात्र सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या की झाले असे सुरू आहे. 

मोबाईल हॅंग !!! 

व्हॉट्‌सएप, फेसबुक, इन्स्टाग्रामयासह एक ना अनेक सोशल माध्यमातून अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. मोबाईल हॅंग होण्याची वेळ आलीय.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

SCROLL FOR NEXT