social workers Sit in the supply officer room in Ichalkaranji kolhapur marathi news 
कोल्हापूर

इचलकरंजीत भाजप कार्यकर्ते भडकले ;  पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात मांडला ठिय्या  

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी  : पुरवठा कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांना शहीद दिन साजरा करण्याचा विसर पडला. त्यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरवठा कार्यालयातील शहीद स्तंभासमोरील समोरील परिसर स्वच्छ करून शहीद दिन साजरा केला. मात्र या कार्यालातील पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीसाठी केल्याचा आरोप केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांनी माफी मागावी अशी मागणी करत  भाजप  कार्यकर्त्यानी पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारला. घटनास्थळी गावभाग पोलिस दाखल झाले.


 संपूर्ण भारतात आज शहीद दिन साजरा होत आहे. शहरात पुरवठा कार्यालयात शहीद स्तंभ आहे. मात्र पुरवठा कार्यालयात शहीद दिन साजरा केला नसून कार्यालयात  शहीदांचे फोटो पूजन ही केले नाही. त्यामुळे  भाजप  कार्यकर्त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करून शहीद दिन साजरा केला.

भाजप कार्यकर्त्यानी शहीद दिन प्रसिद्धीसाठी साजरा केला असल्याचा आरोप पुरवठा अधिकारी डोंगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे  भाजप  कार्यकर्ते अधिकच संतापले. आणि याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरत माफीसाठी त्यांच्या दालनात ठिय्या मारला. त्यामुळे पुरवठा  कार्यालयात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT