Solar powered Solar Bike made by DKTE Electronics students 
कोल्हापूर

कोल्हापूरच्या मुलींची कौतुकास्पद कामगिरी: बनविली सौर उर्जेवर चालणारी ‘सोलरईबाईक'

पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात शिकत असणा-या सना पिंपरे, मानसी सुर्वे, शीतल पाटील, प्रगती माळी, स्वाती माने आणि स्वाती घुणे या विद्यार्थीनींनी सौर उर्जेचा वापर करुन ‘सोलर ई बाईक’ हा प्रकल्प बनविला आहे.


या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी सोलर पॅनेलचा वापर करुन त्यावर सतत चार्ज होणारी एक बाईक तयार केली आहे.  यामध्ये ३ सोलर पॅनेल्स एका छताच्या अर्ध गोलाकार स्वरुपात बसवून बाईकला जोडले आहे.  प्रत्येक पॅनेल १२ व्होल्ट आणि ३ अँपिअर इतकी ऊर्जा  परिवर्तन करते.  हीच ऊर्जा  पुढे बॅटरीला एम.पी.पी. चार्जिंग सर्किटच्या माध्यमातून दिले जाते.  या बाईकमध्ये रिजनरेटीव्ह ब्रेकिंग आणि स्वीच ऑपरेटेड ऑटोमेटीक स्टँड या सुविधाही पुरविल्या आहेत.  तसेच ही बाईक वापरात नसताना बॅटरी काढून घरातील इतर उपकरणे चार्ज करता येतील. अशा प्रकारे सर्वसामान्य ग्राहकांचा दुहेरी फायदा व्हावा अशा हेतुने हा प्रकल्प विद्यार्थ्यांनीनी बनविला आहे.   

 
आज संपूर्ण जग वायु प्रदुषण, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक समस्यांशी लढत आहे.  यात सगळयात महत्वाचा घटक म्हणजे आताच्या वापरात असणा-या पेट्रोल वर चालणा-या गाडया, एक लिटर पेट्रोल मध्ये साधारणपणे ८७ टक्के कार्बनचे प्रमाण असते.  यावर उपाय म्हणून नैसर्गिक सौर ऊर्जेचा वापर करुन लोकांना वापरण्यास सहज व सोपी सोलर ई बाईक बनविलेली आहे.  
सदर प्रकल्प  प्रा. स्मृती पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बनविला असून, हा प्रकल्प एआयसीटीई आणि एमएचआरडी व्दारा आयोजित ‘स्मार्ट इंडीया हॅकेथॉन २०२०’ या स्पर्धेमध्ये कॉग्निझंट टेक्नॉलॉजीसाठी निवड झालेली आहे तसेच ‘मोबिलिटी अ‍ॅन्ड एनर्जी फॉर द फ्युचर’ या थीम अंतर्गत केपीआईटी स्पार्कल यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रथम १०० मध्ये या प्रकल्पाची निवड करण्यात आलेली आहे.


संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष,आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्यासवे सर्व विश्‍वस्त, संस्थेचे डायरेक्टर डॉ.पी.व्ही.कडोले, डे.डायरेक्टर डॉ.यु.जे.पाटील, डॉ.सौ.एल.एस.अडमुठे यांनी विद्यार्थ्यांनींस शुभेच्छा दिल्या.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: छत्रपती संभाजीनगर कन्नड प्रभागातील नगरसेवक पदासाठी चिट्ठी काढून निर्णय, दोन उमेदवारांना समान मतं

साताऱ्यात दोन्ही राजेंना अपक्ष उमेदवाराचा दे धक्का, प्रभाग एकमध्ये अपक्षाने उधळला गुलाल

Shirol Nagar Palika Result : आमदार अशोकराव मानेंचा मुलगा, सून दोघांचाही दारूण पराभव, शिरोळकरांनी घराणेशाही मोडीत काढली...

Nagar Parishad Election Result : शिरोळमध्ये विद्यमान आमदारांना तगडा झटका, यड्रावकर–माने गटाची सत्ता संपुष्टात, मुरगूड–कागल–गडहिंग्लजमध्ये आघाड्यांचे वर्चस्व

Manchar Nagar Panchayat Election Result 2025: मंचर नगराध्यक्षपदाची अटीतटीची लढत; दुसऱ्या फेरीअखेर शिवसेना आघाडीवर

SCROLL FOR NEXT