one more soldier martyr died in kolhapur district shahuwadi villages in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील जवानाचे निधन

अमर पाटील

कोल्हापूर (चरण) : शाहुवाडी येथील सी. आर. पी. एफ जवान अमित भगवान साळुंखे (वय ३०) यांचे बालाघाट (मध्यप्रदेश) येथे सेवा बजावत असताना हृदय विकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. ते आपल्या पत्नी सुवर्णा व मुलगी आस्था यांच्यासोबत मध्यप्रदेशमध्ये येथे होते. गुरवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. वैद्यकीय तपासणीत त्यांना मृत घोषित करण्यात आले.

बुधवारी त्यांनी बहिण अश्विनी यांना फोन केला होता. यावेळी ते म्हणाले आई, पप्पा तुझी खुप आठवण येत असल्याचे सांगितले होते. मी आईला फोन करतो असा निरोप त्यांनी दिला होता. वडिलांनाही त्यांनी सायंकळाच्या दरम्यान फोन केला. त्यांनी आईला फोन करतो असा निरोप दिला. परंतु अजुनही फोन न आल्याने मायलेकांचे संभाषण झाले नाही. 

अमित यांचे वडील भगवान साळुंखे डेक्कन मिल इचलकरंजी येथे नोकरीला होते. १९९९ ते २००० साली मिल बंद पडल्याने त्यांची नोकरी गेली. अमित यांचे प्राथमिक शिक्षण इचलकरंजी आणि माध्यमिक शिक्षण रामगीरी विद्यालय चरण येथे पुर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण श्री. शिव शाहु महाविद्यालय सरुड येथे झाले होते. 

अमित यांना व्हॉलीबॉल खेळण्याचा छंद होता. मी सैन्यात भरती होणार असा शब्द त्यांनी बहिणीला दिला होता. २०१० पुणे येथील भरती दरम्यान सेवेत ते दाखल झाले. बालाघाट येथून त्यांची बदली श्रीनगरला झाली होती. उद्या सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अमित यांचे पार्थिव चरण येथे दाखल होईल. शासकीय इमानात त्यांचेवर अंत्यसंस्कार केले जातील.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT