Radhanagari Crime News esakal
कोल्हापूर

Radhanagari Crime : पेरणीच्या वादातून मुलाने आईच्या डोक्यात खोरे मारून केला खून; घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता

बारडवाडी (ता. राधानगरी) येथे एका तरुणाने आईच्या (Mother) डोक्यात खोरे मारून तिचा खून केला.

सकाळ डिजिटल टीम

या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. याबाबत सचिन बारड यांनी फिर्याद दिली आहे.

सरवडे : शेती कामातून झालेल्या किरकोळ वादातून बारडवाडी (ता. राधानगरी) येथे एका तरुणाने आईच्या (Mother) डोक्यात खोरे मारून तिचा खून केला. राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील बारडवाडी येथे हा प्रकार दुपारी घडला. हल्ल्यात मालूबाई श्रीपती मुसळे (वय ७०) जागीच ठार झाल्या. पोलिसांनी त्यांचा मुलगा संदीप (३२) याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार तेथील सुतारकीचा माळ या शेतात घडला.

या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. याबाबत सचिन बारड यांनी फिर्याद दिली आहे. राधानगरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सोमवारी सकाळी बारडवाडी येथील श्रीपती मुसळे, मालूबाई मुसळे आणि मुलगा संदीप भात टोकणसाठी सुतारकीचा माळ येथील शेतात गेले होते. काम करता करता मुलगा आणि आई-वडील यांच्यात वाद झाला.

नांगरणी व्यवस्थित झालेली नाही, अगोदर नांगरणी करू; मग पेरुया, असे संदीप म्हणत होता; मात्र आईने पाऊस सुरू झाला तर पेरणी होणार नाही, आजच पेरून घेऊया, असे म्हणताच दोघांमध्ये वाद झाला. त्यातून  संदीप याने शेतावर नेलेले खोरे आईच्या डोक्यात घातले. घाव वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गावात समजताच लोक जमले होते. वडील आणि मुलगा दोघांनाही दारूचे व्यसन आहे.

संदीप सेंट्रिंग काम करत होता. मालूबाई यांच्या मागे पती, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. संदीप याला लहान मुलगा व मुलगी आहे. घटनास्थळी पोलिस उप अधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी पाहणी केली. राधानगरीचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह पथकाने पंचनामा केला. सोळांकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्‍छेदन केल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Mumbai Crime: घात की अपघात? विक्रोळीत हत्या झालेले घर जळून खाक, प्रकरणाला नवे वळण

Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदींनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी सकाळीच केली पोस्ट; जाणून घ्या काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT