निपाणी : पाणी पाजण्यासाठी गेल्यानंतर विहिरीत पडलेल्या मेंढ्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या माय-लेकराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.७) सकाळी घडली. ते सौंदलगा (ता. निपाणी) येथील असून नीलव्वा वासू भानसे (वय २२) आणि शिवाजी वासू भानसे (वय ११ महिने) अशी माय-लेकराची नावे आहेत. बळ्ळारी जिल्ह्यातील शिरगुप्पी तालुक्यात सोगरु या गावात ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे सौंदलगा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सौंदलगासह शिरगेरी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, सौंदलगा येथील मेंढपाळ वासू भानसे हे काही वर्षांपूर्वी आपल्या शेळ्या-मेंढ्यांना घेऊन बळ्ळारी जिल्ह्यामध्ये गेले होते. नेहमीप्रमाणे वासू यांची पत्नी निलव्वा ही काही मेंढ्यासह कोकरांना घेऊन पाणी पाजण्यासाठी एका विहिरीवर गेली होती. पाणी पिताना काही मेंढ्यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी तिने काखेतील ११ महिन्याच्या बाळाला शेजारीच ठेवून विहिरीच्या कठड्यावरून मेंढ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तिचाही तोल गेल्याने पाय घसरून ती देखील पाण्यात पडली. पण तिला पोहता येत नसल्याने विहिरीत बुडाली. याचवेळी अकरा महिन्याचा मुलगाही विहिरीच्या कडेला जाऊन तोही विहिरीत पडला. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, बराच वेळ माय-लेक परत न आल्याने कुटुंबातील काही सदस्यांनी त्यांची शोधाशोध केली. पण विहिरीच्या परिसरातच मेंढ्या व कोकरू आढळून आल्याने त्यांनी विहिरीमध्ये शोध घेतला. त्यावेळी माय-लेकराचे मृतदेह मिळून आले. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले. घटनास्थळी शिरगेरी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. लॉकडाउनमुळे दोन्ही मृतदेह सौंदलगा येथे न आणता सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करून घटनास्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत निलव्वा हिच्या मागे पती, सासू, दीर असा परिवार आहे.
हे पण वाचा - देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुरात प्रवेश बंद...
पोटामागे भटकंती करताना काळाचा घाळा
खडकलाट माहेर असलेल्या नीलव्वा हिचा विवाह वासू भानसे यांच्याशी झाला होता. तिला शिवाजी नावाचा मुलगा झाला. पण पोटामागे भटकंती करताना या माय-लेकरांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.