research from Shivaji University: Creation of touchless automatic thermometer 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे दिलासादायक संशोधन ः स्पर्शविरहित स्वयंचलित तापमापक यंत्राची निर्मिती

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाने कोरोना विषाणूच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी उपयुक्त अशा स्पर्शविरहित स्वयंचलित तापमापक यंत्राची निर्मिती केली आहे. गेल्या महिन्यातच या अधिविभागाच्या सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्‍सच्या संशोधकांनी सादर केलेल्या "व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे'च्या संशोधनानंतर हे आणखी एक महत्त्वाचे संशोधन विद्यापीठाच्या संशोधकांनी सादर केले आहे. 
नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील संशोधक, प्रा. डॉ. तुकाराम डोंगळे यांनी इचलकरंजी येथील प्रा. परेश मट्टीकल्ली यांच्या सहकार्याने "स्पर्शविरहित स्वयंचलित तापमापक यंत्र' विकसित केले आहे. मुख्यतः हे यंत्र कोविड योद्‌ध्यांमध्ये वाढणाऱ्या संक्रमणाला आळा घालण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक गरजा लक्षात घेऊन विकसित केले असल्याची माहिती डॉ. डोंगळे यांनी दिली. 
कोरोना विषाणूपासून बचाव, सुटका, प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी संपूर्ण जगभरात विविध संशोधक समूहांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी या अधिविभागातील संशोधक प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेऊन दिलासादायक संशोधन केले आहे. 

असे आहे याचे तंत्रज्ञान... 
स्पर्शविरहित स्वयंचलित तापमापक उपकरणाची कार्यप्रणाली ही जागतिक आरोग्य संघटनेने कोविडसाठी ठरवून दिलेल्या मानकांवर आधारलेली आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या तापमानाची नोंद निर्धारित तापमानापेक्षा अधिक झाली, तर हे उपकरण अलार्मच्या माध्यमातून त्याची सूचना देते, जेणे करून पुढील योग्य त्या दक्षतेसाठी त्याची मदत होते. मुख्यतः हे यंत्र सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित असून, यात अल्ट्रासोनिक आणि इन्फ्रारेड असे दोन्ही प्रकारचे सेन्सर्स वापरलेले आहेत. अल्ट्रासोनिक सेन्सरसमोर आलेली व्यक्ती आणि यंत्रामधले अंतर ओळखते आणि मायक्रोकंट्रोलरला संकेत पाठविते. मायक्रोकंट्रोलरपुढे इन्फ्रारेड सेन्सरला त्या व्यक्तीचे तापमान मोजण्यासाठी एक संकेत पाठवते. त्यानुसार सेन्सरी डेटा मिळाल्यानंतर मायक्रोकंट्रोलरमध्ये त्या डेटावर प्रक्रिया होऊन एलसीडी डिस्प्लेवर संबंधित व्यक्तीचे तापमान दर्शविले जाते. व्यक्तीचे तापमान जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्धारित निकष पायरीहून अधिक नोंद झाले असेल तर लगेच अलार्म वाजतो आणि लाल रंगाची एलईडी लाईट लागते. या यंत्राची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर किमान 5 दिवस सक्षमपणे कार्य करते. 

सर्व ठिकाणी उपयुक्त... 
हे यंत्र मानवी हस्तक्षेपाशिवाय चालत असल्याने स्वतंत्र व्यक्तीकडून तापमानाचे सतत मापन व निरीक्षण करण्याची आवश्‍यकता भासत नाही. साहजिकच एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे होणारे रोगसंक्रमण टाळण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरते. त्यामुळे तापमान मोजणाऱ्या आशा वर्कर्स, नर्सेस, डॉक्‍टर्स तसेच सार्वजनिक ठिकाणी तत्सम सेवा देणारे स्वयंसेवक यांना होऊ शकणाऱ्या रोगसंक्रमणापासून वाचवता येऊ शकेल. बॅटरीवर कार्यान्वित होणारे हे स्पर्शविरहित यंत्र कोठेही सहज ठेवले जाऊ शकते. विविध कार्यालये, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे, मॉल्स व इतर सार्वजनिक ठिकाणी हे उपकरण उपयुक्त ठरू शकते. दरम्यान, या यंत्राच्या व्यापक निर्मितीसाठी विद्यापीठाने काही उद्योग समूहांशी संपर्क साधला असून, लवकरच ते अल्प दरात सर्वत्र उपलब्ध होईल, अशी माहितीही डॉ. डोंगळे यांनी दिली. या संशोधनासाठी अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain News : पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसाने घरे, गाड्या पाण्याखाली, आज शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाचे नागरिकांना सर्कतेचे आवाहन

Britain News: 'ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात मोर्चा'; उजव्या विचारसरणीच्या समर्थकांचा पोलिसांबरोबर संघर्ष

Mumbai Monorail Breakdown : भर पावसात ट्रॅकवर अडकली मोनो रेल, प्रवाशांना बाहेर काढण्यात यश; दोन महिन्यांत दुसरी घटना

कसलं व्यसन नाही, तंदुरुस्त अन् आनंदी आयुष्य; तब्येत बरी नाही मेसेज केल्यानंतर १० मिनिटात सहकाऱ्याचं निधन, बॉसला धक्का

Panchang 15 September 2025: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्र वाचावे व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT