The sound of plates roaming around the village 
कोल्हापूर

गावागावात घुमला थाळ्यांचा नाद

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर ः जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आज देशव्यापी संपात सहभाग घेतला. सर्व कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी द्या, किमान दहा हजार पेन्शन द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोना कामाची सक्‍ती करू नका अशा मागण्यांसाठी अंगणवाडीसेविकांनी आज गावागावात थाळी नाद आंदोलन केले. 
आंदोलनात जिल्ह्यातील 17 प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. महिला व बाल विकास मंत्री, खात्याचे आयुक्तांनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांना कोरोना संबंधीचे काम देऊ नका, असे जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. तरीही जिल्हा प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोनाचे काम दिले जाते. याचा निषेधही केला. यामध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर, ग्रामीण प्रकल्प, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, कागल, आजरा, गडहिंग्जल व चंदगड येथील अंगणवाडी कर्मचारी संपात सहभागी झाल्या. गावातील मुख्य चौकात येऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत, मास्क लावून थाळीनाद केला. जल्हा अंगणवाडी संघाने या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

 
संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT