special article on gram panchayat election by avdhut patil the situation of labour in kolhapur 
कोल्हापूर

'शेतात कामं पडल्यात, पळापळ व्हायला लागलीया' ; कार्यकर्त्यांची होतीये तारेवरची कसरत

अवधूत पाटील

गडहिंग्लज (कोल्हापूर) : ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात आहे. तर ऊस तोडणी हंगाम ऐन भरात आहे. निवडणुका आणि तोडणी हंगाम एकत्रच आल्यामुळे कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. वर्षभर राबलेल्या पिकाकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे कोण तोडणीत तर कोण लावणीत आहे. दुसरीकडे पाच वर्षांनी आलेली निवडणूकही टाळू शकत नाही. परिणामी, दिवसा ऊस तोडणीत अन्‌ रात्री निवडणुकीच्या जोडणीत अशी कार्यकर्त्यांची तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे.

महिन्यानं लागली असती तर...

निवडणूक लागलेल्या एका गावातील स्थानिक नेत्याची गाठ पडली. निवडणुकीबाबत अंदाज घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी सद्य:स्थिती मांडायला सुरवात केली. ‘कोरोनानं निवडणूक पुढे गेली ते गेली. खरं तिलाबी आताच लागायची होती. जरा महिन्यानं आली असती तर बरं झालं असतं. शेतात कामं पडल्यात. पळापळ व्हायला लागलीया, खरं सोडून चालतंय. त्येच्यातनंच मार्ग काढायचा. सोडायचं नाही.’ गावागावातील कार्यकर्त्यांची कमी अधिक प्रमाणात अशीच अवस्था आहे. 

‘त्यांच्या’ ऊस तोडीला प्राधान्य

गावपातळीवरील अनेक नेत्यांच्या ऊस तोडणी टोळ्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा पुरेपूर उपयोग केला आहे. ऊस वेळेत कारखान्याला घालविण्यासाठी शेतकरी आटापिटा करतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक नेत्यांकडून मतांची बेगमी सुरू आहे. आपल्या प्रभागातील शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून मतांची बांधणी करुन घेतली जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT