special article on shenda park fire on tree in kolhapur by b. d chechar 
कोल्हापूर

कोल्हापूर : शेंडापार्कातील झाडांची बहरण्याआधीच झाली राख!

बी. डी. चेचर

आर. के. नगर (कोल्हापूर) : खरंतर आम्ही ठरवलं होतं की पृथ्वीवरच्या काही जमेल तेवढ्या लोकांचा व प्रदूषणाचा थोडा विचार करावा. प्रत्येकाला थोडी का असेना, पण शुद्ध हवा द्यायची. इथूनच मानवाच्या शरीराच्या वेदना थोड्या कमी करण्याचा प्रयत्न करायचा निश्‍चय केला होता. शेंडा पार्कातील माळावर सवंगड्यांसह वाऱ्याबरोबर झुलायचं, मोठं व्हायचं, मोठे झाल्यावर आम्ही सारे शुद्ध हवेचा म्हणजे ऑक्‍सिजनच्या रूपात सर्वांना निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणार होतो.

आम्हाला ४० हजार विविध जातींच्या रोपांना सामाजिक वनीकरण व विविध संस्था आणि सेवाभावी संस्थांनी शेंडा पार्कातील ९० एकर जमिनीवर जन्माला घातलं. आम्हाला हजारो लोकांनी मदत केली. एक स्वप्न होतं, पुढच्या शेकडो वर्षांच्या आरोग्यसंपन्न करार करण्याचा आम्हाला खूप आनंद होता. कारण आमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला आरोग्यदायी हवा देण्याचा उद्देश होता.

कोरोनामुळे आम्ही निर्माण करत असलेल्या ऑक्‍सिजनचं काय महत्त्व हे साऱ्यांनाच कळालं. आणि त्यामुळे प्रशासन व नागरिक तितक्‍यात तळमळतेने लक्ष देऊ लागले. त्यात भर म्हणजे पावसाळ्यात पावसाने ही मदतीचा हात दिल्याने आम्ही सारे बहरू लागलो; पण काही दिवस शिल्लक होते आम्हाला परिपूर्ण होण्यासाठी, मोठे होण्यासाठी. त्यानंतर सर्वांना मायेची सावली नक्कीच मिळणार होती; पण एक दिवस घात झाला.

आम्ही साऱ्यांचं आयुष्य वाढवणार होतो; पण आमचं आयुष्य संपवून टाकलं. आमची राखरांगोळी केली. आम्ही २०००० भावंड आगीत होरपळून अन्‌  होत्याचं नव्हतं झालं. आमचा जीव घेताना काय वाटलं नाही तुम्हाला... तुमच्या आरोग्याची काळजी आणि निरोगी करण्याचा हक्क काढून घेतला तुम्ही... काय चूक झाली आमची ‘स्वच्छ ऑक्‍सिजन देणार होतो’ ही चूक आमची ? स्वच्छता ऑक्‍सिजन देणार होतो ही चूक आमची ? खचरा आणि आरोग्यदायी झाडे यातील फरक तुम्हाला कळत नसेल तर मग याहून अधिक दुर्दैव काय... आम्हाला तुम्ही जिवंत जाळून टाकलं खरं, पण निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही. निसर्गाच्या विरोधात जाणाऱ्याला प्रत्येकाला शिक्षाही मिळणारच...., हे आहे शेंडापार्कातील ऑक्‍सिजन पार्कमधील नुकसान पोहचलेल्या झाडांचे मरणासन्न मनोगत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT