Special attention on three patients from in ichalkanji 
कोल्हापूर

इचलकरंजीत परदेशातून आलेल्या त्या तिघांवर लक्ष...

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - परदेशातून आलेल्या शहरातील तीन रुग्णांवर विशेष लक्ष ठेवले आहे. या रुग्णांबाबत योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. सर्व ठिकाणी त्यांच्या तपासण्या झाल्या असल्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य खात्याने ही दक्षता घेतली आहे.

शहरातील काहीजण हाज यात्रेसाठी कोल्हापूरच्या एका सहल कंपनीतून, तर एक जणाने आधुनिक यंत्रमाग आणण्यासाठी इटली व दुबई या मार्गावर प्रवास केला होता. परदेशातून आल्यानंतर सर्वांची पुणे व मुंबईत आवश्‍यक तपासण्या केल्या. तरीसुद्धा आरोग्य खात्याने याबाबत नागरिकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यातील तीन जणांवर विशेष लक्ष ठेवले आहे. त्यांच्या काही तपासण्या केल्या असून रक्ताचे नमुनेही पाठविले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तिघांना कुटुंबापासून अलिप्त ठेवले आहे. त्याचबरोबर ते ज्या भागात राहतात, त्या भागात नियमितपणे औषध फवारणी व अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत.

संबंधित नागरिक ज्या भागात राहतात त्या परिसरातील नागरिकांवरही विशेष लक्ष ठेवले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेतली आहे. नागरिकांनी भीती बाळगू नये.
- डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी, इचलकरंजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT