special child swarali and mother special story kolhapur 
कोल्हापूर

आई, आजीची वेडी माया, 24 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या स्वरालीची करतात सेवा

धनाजी सुर्वे

कोल्हापूर:  असे  म्हणतात की आईपुढे स्वर्गाचीही महानता  कमी  पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. आईची माया कधीच आटत नाही. मुल कसंही असू  दे आई त्याला भरपूर माया देऊन वाढवते. बाळ मोठे होत असताना त्याच्या त्या तुरू-तुरू धावण्याने आईचा आनंद गगणात मावत नाही. परंतु, एखाद्या आईच्या नशीबी हे सुख येत नाही तरीही ती आपल्या बाळाचा सांभाळ करण्याचे व्रत सोडत नाही. अशीच कोल्हापुरातील एक आई गेल्या २४ वर्षापासून आपल्या मुलीचा सांभाळ करत आहे. 

कोल्हापुरातील क्रशर चौकात राहणाऱ्या अमृता जोशी आपल्या लाडक्या मुलीसाठी जिवाचं राण करत आहेत. स्वराली असं या लाडक्या मुलीचं नाव. स्वराली जन्मल्यापासून एकही शब्द उच्चारली नाही. ती २४ वर्षापासून अंथरूणावर पडून आहे. ती जन्मतः लुळी. तिची मान, मणका, कंबर लुळी आहे. या कुशीवरून त्या कुशीवर वळताही येत नाही. एवढच नाही तर हातात कोणतीही वस्तू धरता येत नाही. अशा स्वरालीची अमृता या गेल्या २४ वर्षापासून सेवा करत आहेत. त्यांना साथ आहे ती स्वरालीसाठीची आजी सरोज यांची. या दोघींसाठी अंपगावस्थेत  स्वराजी काळजाचा तुकडा आहे. जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते. हीच मायेची उब अमृता स्वरालीला देत आहेत. त्या स्वरालीसाठी नवनवीन फॅशनची कपडे आणतात. तिला काय हवे, काय नको ते डोळ्यांनी इशारा करून सांगते. 

स्वरालीच्या आजी सरोज सांगतात, तिचं सारं अंग जखडलेलं आहे. नजर कायम छताकडे. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरही ती वळू शकत नाही अशी तिची अवस्था आहे. स्वरालीचा आजार दुर्धर आहे. तिच्या मणक्‍यात ताकद नाही. तिला बोलता येत नाही. तीचा दुर्धर आजार हे आम्ही संकट मानत नाही. तिच्यात जीव आहे. माया आहे. तिला बोलता येत नाही; पण डोळ्यांची भाषा अजब आहे.  

 आई म्हणजे स्वतः उपाशी राहून, आपल्याला भरवणारी. याच पद्धतीने आमृताही स्वराला दिवसातून दोन तीन वेळा जेवण भरवत असतात. स्वत:च्या नाही पण तिच्या पोटाची जास्त काळजी घेतात. आई म्हणजे जीवाचं रान करून, आपल्यासाठी राबणारी. अमृताही अगदी याच उक्तीप्रमाणे आपल्या लेकीसाठी दिवरात्र राबत असतात.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT