special story of farmer mansing patil less amount and high production in kolhapur ingole 
कोल्हापूर

डोंगर उतारावर पिकवली 'आले' शेती ; पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

राजेंद्र दळवी

कोल्हापूर (आपटी) : पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या इंजोळे येथील प्रयोगशील शेतकरी मानसिंग पाटील यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत कमी खर्चात जादा उत्पन्न देणाऱ्या आले पीक लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यातून इतर नगदी पिकापेक्षा कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळवून दाखविले आहे. 

पन्हाळगडाच्या पायथ्याचा पूर्व पश्‍चिम बांधारी परिसर तसा डोंगर उताराचाच. येथील शेतीही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली. त्यामुळे येथील बहुतांशी जमिनीत भात, नाचना, भुईमुग हीच पिके घेतली जातात. तर काही शेतकऱ्यांनी विहीर कुपनलिकाच्या माध्यमातून बागायत शेती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्‍याच शेतकऱ्यांच्या जमिनीत ऊसाचे उत्पन्न घेतले जाते.

भात, नाचना, भुईमुग ही पिके उसापेक्षा कमी कालावधीत येत असली तरी या पिकांना कष्टाच्या प्रमाणात नफा कमी मिळतो. या पिकांपेक्षा ऊसाला नफा जास्त मिळतो पण त्यासाठी खर्च ही जास्त करावा लागतो. पाटील यांच्या प्रयोगाने एक फायदेशीर मार्ग सापडला आहे.

जंगली जनावरांचा त्रास नाही

पन्हाळ्याच्या बांधारी परिसर डोंगराळ व जंगली असल्याने येथील पिकांचे जंगली जनावरांकडून नुकसान केले जाते; पण आले हे तिखट असल्याने या पिकाला जनावरे खात नाहीत. त्यामुळे या पिकाचे जानावारांपासून नुकसान होत नाही. हा मोठा फायदा आहे.

"शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती करावी."

- मानसिंग पाटील,  प्रयोगशील शेतकरी, इंजोळे

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Pune Research Students Protest: संशोधक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; योजनांकडे दुर्लक्ष केल्याचा राज्य सरकारवर आरोप, तीव्र असंतोष

Minister Bharat Gogawale:'मंत्री भरत गोगावलेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे बिगुल'; विकासकामांचे लोकार्पण; रॅलीद्वारे नागरिकांशी साधला संवाद

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

SCROLL FOR NEXT