special story of world health day effusion problems increased during corona in patients 
कोल्हापूर

जागतिक आरोग्य दिन : कोरोनाकाळात फुप्फुसाचा संसर्ग जीवघेणा

शिवाजी यादव

कोल्हापूर : गेल्या वर्षी कोरोनासंसर्ग सुरू झाला. सर्दी, खोकला, ताप, चव जाणे अशी लक्षणे अनेकांना दिसली. यातील काही जण कोरोनाबाधित सापडले. बहुतांश उपचाराने बरे झाले; पण आजवर एक हजार ७८७ व्यक्तींच्या मृत्यू झाला. या मृतांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक व्यक्तींना फुप्फुसाचा संसर्ग झाल्याची बाब पुढे आली. त्यामुळे कोरोनाकाळात फुप्फुसाचा संसर्ग जीवघेणा ठरतो. फुप्फुसाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्यापासून शुद्ध वातावरणात वावर वाढविणे अपेक्षित आहे, असे हृदयविकार तज्ज्ञ मत डॉ. अक्षय बाफना यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केले.  

वर्षभरात ‘सीपीआर’मध्ये कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. त्यांचा फुप्फुस व हृदयविकाराच्या लक्षणावर डॉ. बाफना यांनी अभ्यास करून काही निरीक्षणे नोंदविली आहेत. ज्यांना गुंतागुंतीचे तसेच जुनाट आजार आहेत, रोगप्रतिकारशक्ती खालावली आहे अशांचा मृत्यू होतो. मृतांतील ७५ टक्के व्यक्तींना फुफ्फुसाचा संसर्ग होता, हेच निदान झाले. 

फुप्फुसाच्या संसर्गाचे स्वरूप व मृत्यूचे प्रमाण   

पॅरेनकयामा संसर्ग

फुफ्फुसातील मांसपेशी (पॅरेनकयामा)ला होणारा संसर्ग न्यूमोनिया म्हणून गणला जातो. यात फुप्फुसाला डावीकडे तसेच उजवीकडे प्रत्येकी दहा कप्पे आहेत. त्यात भागात हा संसर्ग होतो. यात मृत्यूचे प्रमाण ६० टक्के आहे.

फ्लोमन्‍री एम्बोलिझम संसर्ग

फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत होणाऱ्या गाठींचा (फ्लोमन्‍री एम्बोलिझम) संसर्ग : यात रक्तात गाठी होतात. यातील गुंतागुंत हृदयविकारालाही निमंत्रण देते. अनेकदा रक्त पातळ करणारी औषधे याच विकारात देण्यात येतात, मृत्यूचे प्रमाण ३० ते ३४ टक्के आहे. 
 

इंटरस्टेशीलय संसर्ग ः

श्‍वासनलिकेतील मांस पेशीत (इंटरस्टेशीलय) होणारा संसर्ग ः यात संसर्गात न्यूमोनिया होतो. हा संसर्ग दीर्घकाळ राहिला, तसेच गुंतागुंतीचे आजार असतील तर धोका अधिक वाढतो. यात मृत्यूचे प्रमाण २० टक्के आहे.  

ब्रॉन्कायटीस संसर्ग :

श्‍वासनलिकाचा संसर्ग (ब्रॉन्कायटीस) यात नाकातून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या नलिकांना पुढे अनेक उपनलिका जोडलेल्या असतात. त्यात संसर्ग पसरतो, तेव्हा कफ (ब्रॉन्कायटीस) संसर्ग होतो. घट्ट स्वरूपातील हा द्रव नलिकेला चिकटतो, तो निघत नाही, तेव्हा धाप वाढते, घरघर होते. १ ते ५ टक्के मृत्यूचे प्रमाण आहे.  
 

फ्लुरायटिस संसर्ग :

फ्लुरायटिसचा (फुप्फुसाचे कवच) संसर्ग ः संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण एक टक्का आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT