Specific aspects of Rajarshi Shahu Maharaj's biography will now come through WhatsApp Facebook in kohapur 
कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन चरित्रातील विशिष्ट पैलू आता व्हॉट्सअप, फेसबूकच्या माध्यमातून येणार पुढे...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - लेखमाला व ग्रंथवाचनातून राजर्षी छत्रपती शाहू जयंती साजरी करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठा महासंघाने घेतला आहे. युवा अभ्यासक इंद्रजित माने यांची राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवन चरित्रातील विशिष्ट पैलूंवर लिहिलेली लेखमाला व्हॉट्सअप, फेसबूकच्या माध्यमातून पाच दिवस प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. घरोघरी राजर्षी शाहू ग्रंथ वाचून सुरक्षितपणे घरीच शाहू जयंती साजरी करण्यात येणार आहे. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक झाली.

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मराठा महासंघाच्या वतीने त्यांच्या विचारांना प्रेरक अशी साजरी करण्यात येते. राजर्षी शाहू महाराज यांच्या विविध आदेशांसह चित्रमय प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, व्याख्यान, राजर्षी शाहू महाराज यांची छायाचित्रे प्रकाशन, इत्यादी उपक्रमांनी साजरी करण्यात येते. पण, यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे प्रबोधनात्मक साजरी करण्याचे ठरविले आहे.

यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, मारुती मोरे, शैलजा भोसले, उत्तम जाधव, चंद्रकात चव्हाण, डॉ संदीप पाटील, शिवाजी पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील, एकनाथ जगदाळे, प्रकाश पाटील, डॉ प्रदीप पाटील, सुहास निंबाळकर, संतोष सावंत, सुनील पाटील, अमर पाटील, अवधूत पाटील उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT