कोल्हापूर

रस्त्यावर थुंकणे पडले महागात, तरूणावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी

कोल्हापूर ः रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी मोटारसायकलस्वारावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. विक्रम विद्याधर नांदगावकर (वय 39, रा. सानेगुरुजी वसाहत, मूळ रा. रत्नागिरी) असे त्या संशयिताचे नाव आहे. बसंत बहार रस्त्यावर हा प्रकार घडला. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती ः बसंत बहार रोडवर काल (ता. 2) सकाळी सव्वादहाच्या सुमारास एक तरुण मोटारसायकलवरून जात होता. त्याने तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तो गाडीवरून जाताना मावा खाऊन थुंकत जात होता. त्या वेळी याच मार्गावरून मोपेडवरून सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर जात होत्या. त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी त्याला थांबवून "गाडीवरून जाताना थुंकू नका, तोंडाला मास्क लावा, तुमच्या थुंकण्याने इतरांच्या जीविताच्या आरोग्याला धोका पोचू शकतो' असे समजावून सांगितले. पण, त्याने "तुम्हाला काय करायचे, तुमच्या अंगावर पडले का?' असे उद्धट उत्तर त्यांना देऊन तो तेथून निघून गेला. शिपूरकर यांनी त्याच्या मोटारसायकलचा फोटो काढला होता. तो त्यांनी सोशल मीडियावर टाकला. ही बाब पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबतची कारवाई करण्याची सूचना शहर वाहतूक पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांना दिली. त्यानुसार श्री. बाबर, पोलिस उपनिरीक्षक शाम देवणे, हवालदार दया पाटील, सचिन दुधाणे यांनी मोटारसायकल क्रमांकानुसार संशयित तरुणाचा शोध घेतला. त्याचे नाव विक्रम नांदगावकर असून, तो मूळचा रत्नागिरीचा आहे. तो पेंटिंगचा व्यवसाय करतो, अशी माहिती पुढे आली. त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरक्षिततेची काळजी न घेता, मास्क न लावता मावा खाऊन रस्त्यावर थुंकल्या प्रकरणी कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बाबर यांनी सांगितले. 


फोटोवरून घेतला शोध... 
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत स्वच्छतेसह सोशल डिस्टन्सिंगची काळजी सर्व जण घेत आहेत. या काळात रस्त्यावर थुंकण्याचा प्रकार करणाऱ्या तरुणाच्या मोटारसायकलच्या फोटोवरून पोलिसांनी सुरवातीला नागाळा पार्कात त्याचा शोध घेतला. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे त्याला सानेगुरुजी वसाहतीतून शोधून काढल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT