कोल्हापूर : शिवछत्रपती पुरस्कार अंतर्गत देण्यात येणारा क्रीडा संघटक पुरस्कार दोन वर्षे बंद आहे. तो पुन्हा सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असले तरी शासनदरबारी दुर्लक्ष केले जात आहे. राज्यभरात क्रीडा संघटकाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुरस्कार सुरू करण्याबाबत लक्ष घालावे, यासाठी विविध संघटनांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिवछत्रपती पुरस्कार अंतर्गत क्रीडा संघटक पुरस्कार दिला जात होता. एखाद्या क्रीडा संघटक आणि क्रीडा प्रकाराचा कसा प्रचार व प्रसार केला, किती ठिकाणी त्या क्रीडा प्रकारांच्या जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले. आदी निकषांव्दारे निवड केली जात होती. सुरुवातीच्या काळात क्रीडा संघटकाचा पुरस्कार राज्यभरातील तीन व्यक्तींना दिला जात होता. यात सर्व क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव असायचा. हा निकष बदलून पाच व्यक्तींना पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झाली.
तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीत हा आकडा सातवर गेला. जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष (कै.) सखारामबापू खराडे, फुटबॉल प्रशिक्षक शिवाजी पाटील, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रा. संभाजी पाटील, अथलेटिक्स असोसिएशनचे आर. बी. पाटील व एस. व्ही. सूर्यवंशी, हॉकीपटू कुमार आगळगावकर, हॅंडबॉल संघटनेचे आर. डी. पाटील, ज्येष्ठ शरीरसौष्ठव प्रशिक्षक बिभीषण पाटील, पोलिस अधीक्षक माधवराव सानप कोल्हापूर विभागातून या पुरस्काराचे मानकरी ठरले. शेवटचा पुरस्कार श्री. सूर्यवंशी यांना मिळाल्यानंतर पुरस्कार बंद केला.
जिल्हा कबड्डी संघटनेने क्रीडा संघटक पुरस्कार पुन्हा सुरू व्हावा, असा ठराव करून राज्य संघटनेकडे पाठवला आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांप्रमाणे खेळातही खेळाडू, पंच, संघटक व प्रेक्षक हे चार स्तंभ आहेत. त्यातील एखादा जरी निखळला तर खेळाचा विकास खुंटतो. क्रीडा संघटक आचा पुरस्कार संबंधित व्यक्तीला उभारी देणारा असतो.
- प्रा. डॉ. रमेश भेंडिगिरी, कबड्डी प्रशिक्षक.
जिल्ह्यात तीन मंत्री, तीन खासदार आहेत. त्यांनी पुरस्कार सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे. तो पुन्हा सुरू झाल्यास क्रीडा संघटक म्हणून काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांत उभारी येईल.
- एस. व्ही. सूर्यवंशी, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार विजेते.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.