Sports training center to be set up in the district Initiatives by ‘Khelo India’; Scholarships awarded to players in three sports 
कोल्हापूर

खुशखबर : आता कोल्हापूरात साकारणार स्पोर्टस्‌ ट्रेनिंग सेंटर

संदीप खांडेकर

कोल्हापूर : खेलो इंडियाच्या नॅशनल प्रोग्रॅम फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्पोर्टस्‌ अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात तीन खेळांचे प्रशिक्षण केंद्र साकारणार आहे. त्यात सिलेक्‍ट होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वर्षाकाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयातून पाच खेळांचा प्रस्ताव पाठविला आहेत. पैकी तीन खेळांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ९० खेळाडूंचे भाग्य उजळणार आहे.


ऑलिंपिकमध्ये देशातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पदके मिळवावीत, यासाठी खेलो इंडियाचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळविलेल्या खेळाडूंची त्याकरिता निवड करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. किमान तीन खेळांच्या प्रशिक्षण केंद्रांवर प्रत्येकी पाच लाख रुपये सोयी सुविधांसाठी खर्चही केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडूंन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची यादी तयार केली जात आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून अशा खेळाडूंची प्रमाणपत्रे मागविली आहेत.
जिल्ह्यात बहुतांशी खेळ खेळले जातात. विशेषतः कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, जलतरण, हॉकी, क्रिकेट, अथलेटिक्‍स, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, कबड्डी, खो-खो, रग्बीमध्ये खेळाडूंचा दबदबा आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची कमतरताही जिल्ह्यात नाही. त्यामुळे क्रीडा कार्यालयाने निवडक पाच खेळांसाठी प्रस्ताव तयार केला आहे. यात फुटबॉल, हॉकी, कुस्ती, नेमबाजी व खो-खो यांचा समावेश आहे. कार्यालयाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्रे आणून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रमाणपत्रेही कार्यालयाकडे आली आहेत.


आलिंपिकवर लक्ष केंद्रित
केंद्र सरकारने २०२४ व २०२८ च्या ऑलिंपिक स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने विविध खेळात पदक मिळवणारे खेळाडू तयार व्हावेत, अशी भूमिका आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. ऑलिंपिक, एशियन, कॉमनवेल्थमध्ये समाविष्ट असणाऱ्या खेळांचा समावेश या योजनेंतर्गत केला आहे.

प्रत्येक खेळात किमान तीस खेळाडूंचा सहभाग असेल. यात पंधरा मुले व पंधरा मुली असाव्यात, असे निश्‍चित केले आहे. सेंटरच्या जागेची पाहणी साईतर्फे करण्यात येणार असून, त्यातील त्रुटी दूर केल्यानंतर खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : लासलगावात टर्फ मैदानावर राडा! भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला

धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

SCROLL FOR NEXT