ssc and hsc students are now waiting for the results 
कोल्हापूर

दहावी-बारावीचा निकाल कधी ? वाचा...

युवराज पाटील

कोल्हापूर - दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाचे वेध लागले आहेत. कोविडमुळे निकालाला विलंब होत असून, पुढील प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडेल.कोल्हापूर विभागीय मंडळाच्या स्तरावर बारावीच्या निकालाची तयारी पूर्ण झाली आहे. दहावीचा निकाल आठवडाभरात तयार होईल. राज्यातील नऊही विभागीय मंडळांचा निकाल एकत्रितपणे जाहीर करावा लागतो. मुंबई, ठाणे, पुणे येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने तेथील पेपर तपासणी आणि नंतरच्या कामावर निकालाची तारीख अवलंबून आहे. कोविडचा प्रादुर्भाव सुरू होण्यास सुरवात झाली, त्या वेळी बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. दहावीचा भूगोलाचा एक पेपर कोविडमुळे रद्द झाला. पेपरला सरासरी गुण दिले जातील. बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. नंतर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

शासनाने शाळा-महाविद्यालयांना अद्याप परवानगी दिलेली नाही. बारावीच्या ऑनलाईन निकालानंतर आठ दिवसांनी गुणपत्रिका दिल्या जातील. गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात यावे लागते. त्या वेळी सोशल डिस्टन्स राखले जाणार का, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे निकालानंतर दहावी-बारावीच्या गुणपत्रिका प्रत्यक्ष हाती देणार की त्या ऑनलाईन? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT