10th Passed Students Celebrated in Kolhapur esakal
कोल्हापूर

SSC Result : हलगी-घुमक्याचा ताल, गुलाल-पिवडीची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मोठा जल्लोष

बारावीच्या निकालानंतर आठवड्याभरात दहावीच्या परीक्षेचा काल ऑनलाईन निकाल (SSC Result Online) जाहीर झाला.

सकाळ डिजिटल टीम

निकाल समजताच यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यांच्यावर कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

कोल्हापूर : हलगी-घुमक्याच्या तालावर गुलाल-पिवडीची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, पेढे-मिठाई वाटप आणि आपल्या गल्ली, वॉर्ड, गावातून मोटारसायकलची फेरी मारत काल कोल्हापुरातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी (SSC Exam Result) जल्लोष केला. यशस्वीतांची छायाचित्रे, त्यांची गुणपत्रिकांसह शुभेच्छा, अभिनंदनाचे स्टेटस् अनेकांच्या ‘स्मार्टफोन’वर झळकले.

बारावीच्या निकालानंतर आठवड्याभरात दहावीच्या परीक्षेचा काल ऑनलाईन निकाल (SSC Result Online) जाहीर झाला. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. दुपारी एकच्या सुमारास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केला. बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्या घरातच कुटुंबीयांसमवेत निकाल जाणून घेतला, तर काहींनी त्यांच्या परिसरातील नेटकॅफेचा आधार घेतला.

निकाल समजताच यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यांच्यावर कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पेढे, मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. अनेकांच्या स्टेटस्, डीपी आणि स्टोरीवर यशस्वी विद्यार्थ्यांची छायाचित्रे, गुणपत्रिकांसह अभिनंदनाचे संदेश, तर शाळांच्या फलकांवर गुणवंत विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांना मिळालेली टक्केवारीची माहिती झळकली. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत गुलाल-पिवडीची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि सेल्फी टिपत आनंदोत्सव साजरा केला. कसबा बावड्यातील शुगर मिल परिसरात काही तरुणांनी साउंड सिस्टिम लावून जल्लोष साजरा केला.

भारी वाटतंय, जाम खूश हाय...

बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्रामुळे बहुतांश विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढली आहे. नातेवाईक, मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्यानंतर यशस्वी विद्यार्थी हे भारी वाटतंय, जाम खूश हाय, आता नुसता जल्लोष करणार, अशा अस्सल कोल्हापुरी स्टाईलमध्ये प्रतिसाद देत होते.

‘सायलेन्सर’ काढणाऱ्यांचा पळ

शहरातील कसबा बावड्यासह उपनगर आणि ग्रामीण भागात उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी त्यांच्या मित्रांसमवेत मोटारसायकलचा ‘सायलेन्सर’ काढून फिरवित होते. दुपारच्या वेळेत मोठा आवाज करत मोटारसायकल फिरविणे काही नागरिकांना त्रासदायक ठरले. त्यांना या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात अशी मोटारसायकल फिरविण्यास मज्जाव केला, तर काही नागरिकांनी थेट पोलिसांना फोन केला. पोलिस आल्यानंतर मात्र, या विद्यार्थ्यांनी तेथून पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT