ssc examination coming up on one day, the education department has made proper preparations for the examination in belgum distric 
कोल्हापूर

दहावीची परीक्षा एक दिवसावर ; शिक्षण खात्याने केलीय ही तयारी...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - दहावीची परीक्षा एक दिवसावर आल्याने शिक्षण खात्याने परीक्षेची जय्यत तयारी केली असुन मंगळवारी परीक्षा केंद्र आणि शाळा आवारात मशिनव्दारे निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. काही ठिकाणी महापालिका व शिक्षण खात्यातर्फे तर काही शाळांनी स्व खर्चाने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच सामाजिक अंतर राखण्यासाठी शाळा आवारात बॉक्‍स बनविण्यात आले आहेत. यावेळी बेळगाव शैक्षणिक जिल्हातील 33180 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असुन इतर जिल्हातील 410 विद्यार्थीही शैक्षणिक जिल्हात परीक्षा देणार आहेत.

बेळगाव शैक्षणिक जिल्हातील 124 परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार होणार असुन शिक्षण खात्यातर्फे विद्यार्थ्यांना मास्कचे वितरण केले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन मास्क दिले जाणार असुन शिक्षण खात्याने तब्बल 71541 मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे क्रमांक घालण्याचे काम पुर्ण करण्यात आले असुन परीक्षा केंद्रावरील क्रमांक बुधवारी विद्यार्थी पाहु शकतात तसेच केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपरच्या दिवशी कशा प्रकारे थर्मल स्कॅनिंग केले जाईल. यासह इतर प्रकारची माहिती एक दिवस अगोदर दिली जाणार आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्हातील दहावी परीक्षेची माहिती

  • जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या - 33180
  • पर जिल्हातील विद्यार्थी - 410
  • परीक्षा केंद्राची संख्या - 124
  • राखिव परीक्षा केंद्रे - 16
  • मास्कची संख्या - 71541
  • थर्मल स्कॅनिंग मशिन - 455
  • सॅनिटायजर्स - 695 लिटर
  • पर जिल्हातील विद्यार्थी - 410
  • दुसऱ्या जिल्हात परीक्षा देणारे विद्यार्थी - 381
  • परीक्षा खोल्यांची संख्या - 1923
  • मुख्य परीवेक्षक - 104
  • उप मुख्य परीवेक्षक - 44
  • मार्ग अधिकारी - 44
  • जिल्हास्तरीय पाहणी अधिकारी - 65

खाजगी वाहनांची सोय, तसेच बस 75 फेऱ्या

दहावीच्या परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने विद्यार्थ्याची ये जा करण्यासाठी 45 खाजगी वाहनांची सोय केली असुन बेळगाव शैक्षणिक जिल्हातील 10224 विद्यार्थी चालत परीक्षा केंद्रावर येणार आहेत तर सायकल घेऊन 831, स्वत : चे वाहन घेऊन 16233 शाळेच्या बसने 112 तर परिवहन मंडळाच्या बसने 6190 विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येणार आहेत. परीक्षा काळात परीवहन मंडळाने 9 विषेश बसची सोय केली आहे या बस 75 फेऱ्या मारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT