st bus break fail kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

इचलकरंजीत ब्रेक फेल एसटीचा थरार ; चालकाने बस चढविली दुभाजकावर

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - भरधाव एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे आज सकाळी फिल्टर हाउसजवळ थरार निर्माण झाला होता. प्रसंगावधान राखत चालकाने बस थेट दुभाजकावर घातली. याच दरम्यान बसने दोन दुचाकींना धडक दिल्याने तिघे जखमी झाले. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे. 

नृसिंहवाडीहून अब्दुललाटमार्गे सात प्रवासी घेऊन एसटी बस येथील मध्यवर्ती बसस्थानकात येत होती. जुन्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या इमारतीनजीक दुचाकीस्वार आडवा आल्यामुळे चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसचा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. यानंतर प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालकाने फिल्टर हाऊसनजीक आल्यानंतर थेट बस दुभाजकांवर घातली. या वेळी बस दुभाजकाच्या मध्यभागी आल्याने जागेवर थांबली. 

याच दरम्यान, एसटी बसची दोन दुचाकींना धडक बसली. यामध्ये शेखर राजाराम बडगुजर (घोरपडे नाट्यगृहानजीक), गौरय्या लचय्या अडीगोपूळ (पाटील मळा, सांगली रोड), महेश किसनगोपाल सारडा (महेशनगर) जखमी झाले. 

जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. या थरारक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुभाजकावर अडकलेली एसटी बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT