st drivers and conductors face the problems in mumbai lockdown period 
कोल्हापूर

Video : साहेब आम्ही काय रोगी हाय काय ? आम्हाला असं का ठेवलंय ? तर साहेब म्हणाले, भोगा तुमच्या कर्माची फळं...

शिवाजी यादव

कोल्हापूर - कोरोनाचे संकट मुंबईत दिवसा गणिक ठळक होत आहे. एसटी चालक - वाहक मुंबईत अत्यावश्‍यक सेवा बजावत आहेत. त्यांना गैरसोयी सोसाव्या लागत आहेत. त्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनव्दारे दिली जाते. तेव्हा एसटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चालक - वाहकांना धीर देण्या ऐवजी त्यांचा पाण उतारा करीत माणूसकी की पेक्षा आपल्या पदांचे श्रेष्ठत्व सिध्द केले आहे. त्यांच्या संभाषणाची क्‍लिप व्हायरल झाल्याने ही गंभीर बाब उघडकीस आली आहे.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मुंबईत आरोग्य, शासकीय, निम शासकीय यंत्रणा दिवस रात्र राबत आहेत. त्यांना आपल्या कार्यस्थळी पोहचविण्यासाटी एसटी महामंडळाने मुंबईत बस सेवा सुरू केली आहे. या बसवर काम करण्यासाठी राज्यातील इतर जिल्ह्यातील एसटी चालक वाहकांना बोलवले आहे. त्यानुसार सातारा ,कोल्हापूर, सांगलीतून अनेक चालक - वाहका मुंबईत सद्या सेवा बजावत आहेत. त्यांची निवासाची व जेवणाची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे.

त्यासाठी कामी रहाणाऱ्या चालका - वाहकांना जेवण लांबून देण्यात येते. ते उघड्यावर ठेवण्यात येते. त्यावर माशा बसतात तसेच काही वेळा कुत्रा त्या जेवनात तोंड घालतो हा अनुभव या एसटी चालक - वाहकांनी घेतला. त्याची माहिती देण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील आगार प्रमुखांना दिली तेव्हा आगार प्रमुख कर्मचाऱ्यांवर संतापले त्यांनी संबधीत चालक वाहकांना 'निट रहा' असा उपदेश दिला तसेच जे अधिकारी सेवा देता ते तुमच्या पेक्षा वरिष्ठ आहेत असा भलताच सल्ला दिला.

वाचा - ...तर जगभरातील कोरोना संकट होईल दूर                                                

यावर तर संबधीत कर्मचाऱ्यांनी आमची वैद्यकीय तपासणी केलेली नाही. मास्क दिलेला नाही. आम्ही आजारी आहोत की नाही हेही तपासलेले नाही असे असताना आम्हाला बाहेरून जेवण दिले जाते, त्यात कुत्रे तोंड घालते यावर काय करावे असा प्रश्‍न केला मात्र त्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर न देता तसेच चार समजूतीच्या धीराच्या गोष्टी न सांगता अधिकाऱ्यांनी संताप केला. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्यावर घाला घातला आहे.

एसटी मान्यता प्राप्त संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "संबधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांतींल संभाषण आमच्या पर्यंत आले आहे. ही बाब गंभीर आहेच एसटी चालक - वाहक अत्यावश्‍यकसेवा देण्यासाठी मुंबईत गेलेत त्यांची किमान जेवण व आरोग्याची सोय करणे अपेक्षीत आहे. ती सोय केली आहे मात्र त्या विषयी काही उणिवा असतील तर अधिकाऱ्यांनी किमान त्यांचे एकून घेणे व त्यातून मार्ग काढणे, धीर देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे.  मात्र अटी तटीच्या वेळी कर्मचारी सेवा देतात त्यांनाच असा अपमान करणे योग्य नाही.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT