ST employees will get only 50 percent salary 
कोल्हापूर

धक्कदायक : एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 50 टक्केच पगार 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर :  कोरोना लॉकडाऊनमुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद राहिली. एसटी महामंडळाला जेमतेम प्रवासी लाभला. त्यामुळे अपेक्षीत महसुल नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना जूनचे वेतन 50 टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील जवळपास एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचे जूनचे वेतन 50 टक्के देण्याबाबत परिपत्रक एसटीच्या मुख्यालयाकडून विभाग नियंत्रकांना पाठवले आहे. पुढील महिन्यांच्या वेतना विषयी स्पष्ट आदेश नाहीत. वीस दिवसापूर्वी जिल्ह्यांर्तगत प्रवासी सेवा सुरू केली मात्र त्याला प्रवासी प्रतिसाद नाही. 

एसटीचा दोनशे कोटींचा महसुल बुडाला आहे. तरीही अत्यावश्‍यक सेवेसाठी तसेच परप्रांतीय कामगारांची वाहतुक करण्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. एसटी महामंडळाळाकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलती पोटीची 270 कोटी रूपये राज्य शासनाने एसटी महामंडळाला दिले आहेत. त्या रक्कमेतून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याला ही खीळ बसली आहे. 

धोका पत्करून एसटी कर्मचाऱ्यांनी अत्यावश्‍यक सेवेसाठी गाड्या चालविल्या. राज्य शासनाने सवलत मुल्याचे 270 कोटी रूपये एसटीला दिले. तरीही 50 टक्के वेतन कपात केल्याने कर्मचाऱ्यात असंतोष आहे. कोरोना काळात कर्मचाऱ्यांवर अर्थिक संकट ओढावणार आहे. 
- संदीप शिंदे, राज्याध्यक्ष, राज्य एसटी कर्मचारी मान्यता प्राप्त संघटना. 


दृष्टिक्षेप 
- लॉकडाऊनमुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद 
- लॉकडाउन शिथील नंतरही जेमतेमच प्रवासी 
- एसटीचा दोनशे कोटींचा महसुल बुडाला 
- एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना अर्थिक अडचणींचा सामना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Adityanath: सीएम योगींची गोरखपूरला 'सायन्स म्युझियम'ची भेट; ७५ कोटींच्या प्रकल्पातून 'त्रिवेणी' विज्ञानदर्शन!

ढिंग टांग : मेरे देश की धरती सोना उगले…! (एक मनोरम अर्थवृत्तांत…)

Document Digitization : जुने दस्त डिजिटल स्वाक्षरी स्वरूपात, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय; ३० कोटी दस्तांचा समावेश

अग्रलेख : खेळालाही युद्धझळा

Diwali Investment : मुहूर्तावर शेअर खरेदीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT