The staff disappeared at five o'clock; Notice served 
कोल्हापूर

पाच वाजताच कर्मचारी होतात गायब...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आस्थापना शाखेतील कर्मचारी पाच वाजताच गायब झाले. असा प्रकार दररोजच होत असल्याच्या तक्रारी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याकडे केली. या वेळी साडेपाच वाजता तक्रार आल्यानंतर सामान्य प्रशासनचे अधीक्षक राहुल मोरे यांना या विभागात भेट देण्याची सूचना दिली. यावेळी या विभागात एकही कर्मचारी नसल्याचे निदर्शणास आले. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. 

जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. यावेळी कारण आहे ते आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांची दांडी. सध्या पाच दिवसाचा आठवडा सुरू आहे. यामध्ये सोमवारी कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी उपस्थितीत असतात असे गृहीत धरून लोक जिल्हा परिषदेला येतात. मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी येऊनही बांधकाम विभागाची आस्थापना शाखा दुपारनंतर रिकामीच असते, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी श्री. आडसूळ यांच्याकडे केली होती. आज सायंकाळी साडेपाच वाजता अशीच तक्रार प्राप्त झाली.

त्यामुळे खात्री करण्यासाठी श्री. आडसूळ यांनी कर्मचाऱ्यास बांधकामच्या आस्थापना शाखेत पाठवत वस्तुस्थिती पाहण्यास सांगितले. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याला आस्थापना शाखा रिकामी असल्याचे पाहायला मिळाले. 

सामान्य प्रशासनच्या या कर्मचाऱ्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांना वस्तुस्थिती सांगितली. यावर त्यांनी अधीक्षक राहुल मोरे यांना या विभागात जावून कर्मचाऱ्यांची नावे आणि हजेरी पत्रक आणण्याची सूचना केली. यावेळी आस्थापना शाखेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस त्यांनी लागू केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

शाहरुख खानच्या घरी गणपती बसतो पण त्याची पूजा कोण करतं? अभिनेत्याने स्वतः सांगितलं नाव, म्हणाला-

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT