Starts on the journey of Mahashivratri in Vadnage
Starts on the journey of Mahashivratri in Vadnage 
कोल्हापूर

वडणगेत महाशिवरात्री यात्रेला प्रारंभ 

सकाळवृत्तसेवा

वडणगे : हर हर महादेवचा अखंड जयघोष आणि भाविकांच्या उदंड उत्साहात वडणगे( ता करवीर )येथील महाशिवरात्री यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. सलग तीन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त गावात विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.यात्रेनिमित्त झोपाळे, पाळणे आणि खेळण्याच्या स्टॉलने संपूर्ण गाव गजबजून गेले आहे. 

सरपंच सचिन चौगले व उपसरपंच शुभांगी पोवार यांच्या हस्ते आणि सर्व सदस्य,यात्रा समिती यांच्या उपस्थित महादेव मंदिर व पार्वती मंदिरात मध्यरात्री महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दोन्ही मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. दुपारी बारा वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात सवाद्य पालखी सोहळा झाला. 
रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी झाली होती. आकर्षक विद्युतरोषणाईने दोन्ही मंदिरे उजळून निघाली होती.पार्वती व महादेव मंदिर परिसरात आणि पार्वती गल्लीच्या दुतर्फा विविध प्रकारची खेळणी व खाद्यपदार्थाचे स्टॉल मांडण्यात आले होते. यात्रेतील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन यावर्षी मोठे पाळणे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल तलावाच्या परिसरात हलवण्यात आले होते. 

महादेव मंदिर परिसरात आदर्श कॉर्नर मंडळाच्यावतीने खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते व पार्वती मंदिर परिसरात शिवपार्वती मंडळाच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. गृहराज्यमंत्री व पालकमंत्री सतेज पाटील, सौ प्रतिमा पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, जिल्हा बॅंक संचालक बाबासाहेब पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, शांतादेवी डी. पाटील आदीनी येथे दर्शन घेतले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT