shekru sakal
कोल्हापूर

शेणगाव येथे गावाशेजारी आढळला राज्यप्राणी 'शेकरू'

भुदरगड तालुक्यातील जंगलामध्ये रानगवे व अन्य प्राणी मोठ्या संख्येने आढळतात

अरविंद सुतार

कोनवडे : भुदरगड (Bhudargad) तालुक्याच्या पश्चिम भागातील शेणगाव, फये ह्या सह्याद्रीच्या कुशीत मोठ्या प्रमाणावर जंगल संपदा आहे. या जंगलात अनेक पशुपक्ष्यांचा वावर नेहमीच आढळतो. पण गेल्या दोन दिवसांपासून राज्यप्राणी असलेला 'शेकरू' भुदरगड (Bhudargad) तालुक्यातील शेणगाव (shengaon) येथील मनुष्यवस्तीतच गावाशेजारी आढळला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमीमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

भुदरगड तालुक्यातील जंगलामध्ये रानगवे व अन्य प्राणी मोठ्या संख्येने आढळतात. किंबहुना भुदरगड आणि राधानगरी जंगल रानगव्यासाठीच प्रसिद्ध आहे. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. याशिवाय रानडुकर, भेकर, क्वचित बिबट्यासुद्धा आढळतो. पण आता राज्यप्राणी म्हणून गणला गेलेला 'शेकरू' आढळल्याने या विपुल जंगलात अनेक पशुपक्षी असण्याची शक्यता बळावली आहे. शेणगाव, फयेच्या जंगलात शेकरू राज्यप्राणी आढळल्याने निसर्गप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे.

शेणगाव परिसरात तीन दिवस हा शेकरू राज्य प्राणी या फळांच्या झाडाझुडपात पेरू, कोवळे नारळ, पपई खाण्यात मशगूल असल्याचे दिसून आले. याबद्दल अधिक माहिती देताना वाईल्डलाईफचे विजय पाटील म्हणाले, असे दुर्मिळ दृष्य मनुष्याला सहजगत्या पाहायला मिळणे हा एक मोठा दुर्मिळ योगायोग आहे. कधी कधी मोठी जंगले पालथी घातली तरी हा प्राणी सहसा नजरेस पडत नाही. त्यामूळे या प्राण्याची अंगभूत कौशल्ये व त्याच्या आनंददायी हालचालीचा फोटो शूट करत आंम्ही आनंद घेत आहोत. आमच्या दृष्टीने निसर्गाचा हा मुक्त अविष्कार आहे एक अनोखी पर्वणी आहे.

 ते पुढे म्हणाले की, येथे रहिवास करून असलेला हा शेकरू मादी आहे. हा राज्यप्राणी शेकरू हा अतिदुर्मिळ वेगाने नामशेष होणाऱ्या वन्य जीवांच्या यादीत आहे. राज्यप्राणी शेकरूने हा रहिवास निर्माण केल्यास नवल वाटू नये इतका हा परिसर जैव विविधतेने आणि पर्यावरणाने समृध्द आहे. अशा समृध्द निसर्गदत्त वातावरणात या शेकरू प्राण्याचा रहिवास ही या परिसराच्या दृष्टीने आनंददायी बाब आहे. हा जंगल परिसर समृध्द बनल्याचे हे लक्षण आहे. या शेकरू प्राण्याची संख्या वाढत असल्याचे हे लक्षण आहे.

मेळघाटचे जंगल, दांडेली चे अभयारंण्य, दाजीपूरचे अभयारंण्य व भिमाशंकरच्या जंगलात या राज्यप्राणी शेकरूचे दर्शन होते. कोकण किनारपट्टीच्या जंगलातही काही ठिकाणी या दुर्मीळ प्राण्याचा अधिवास आहे. पश्चीम घाटमाथ्याच्या या जंगल परिसरात या राज्यप्राणी शेकरूचा वावर वाढला आहे. हा प्राणी लाजाळू आहे. मानवी वस्तीत सहसा न येणारा हा प्राणी यावेळी वस्तीत आलेने अनेकांना आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान या राज्यप्राणी शेकरू ला मानवनिर्मित इजा होवू नये यासाठी वन विभागाने या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देवून समाधान व्यक्त केले. स्थानिक नागरिकांना सुचना दिल्या.

"आकर्षक व देखणा प्राणी."

'शेकरू' हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात.

खारीच्या वर्गात येणारा हा प्राणी आकाराने मोठा असतो. भारतात जायंट स्क्विरल प्रजातीच्या एकूण ७ उपप्रजाती आढळतात. त्यापैकी 'राटूफा इंडिका' (RATUFA INDICA) ही उपप्रजाती फक्त महाराष्ट्रात आढळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT